Ankush Tv18 news network
अकोट, – तालुक्यातील आलेवाडी येथील छावा संघटनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. निवृत्ती पाटील वानखडे यांना समाजसेवेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
श्री. वानखडे हे गेल्या २० वर्षांपासून छावा संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागात समाज प्रबोधन, युवकांचे मार्गदर्शन, आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत शिवप्रतिष्ठान राज्य संस्था, पुणे यांच्या वतीने त्यांना “समाजरत्न पुरस्कार” पुणे येथे एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना श्री. निवृत्ती वानखडे म्हणाले, “हे संपूर्ण यश माझे नसून माझ्या मागे उभ्या असलेल्या छावा संघटनेचे आहे. विशेषतः संघटनेचे अध्यक्ष श्री. शंकरराव वाकोडे यांनी नेहमीच मला मार्गदर्शन आणि मानसिक आधार दिला. त्यांच्या प्रेरणेनेच मी समाजकार्याची वाट निवडली आणि सातत्याने सेवा करत राहिलो.”
या गौरवाबद्दल त्यांचे तालुक्यातून, आलेवाडी ग्रामस्थांतून तसेच छावा संघटनेतील सहकाऱ्यांकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.