Ankush tv18 news network
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाला लागुन असलेल्या बांभोरी शिवारात गालापुर रोडवर फैजल शेख यांचे शेतात काही इसम जुगाराचा खेळ खेळत फैजल शेख यांचे शेताला लागुन असलेल्या नाल्याकाठी काहीइसम जमिनीवर बसुन घोळका करुन पैसे टाकुन पत्त्याचा खेळ खेळतांना छापा टाकुन त्यांचेवर कारवाई करण्यात आली
जुगार पकडलेल्या इसमामध्ये १) शेख फारुख शेख नबी वय ५० वर्षे, २) शेख शहीद शेख रफिक वय ४० वर्षे, ३) शेख निजाम शेख सिराज वय ५२ वर्षे ४) तस्लीम सुलेमान खान वय ५७ वर्षे ५) शेख हमीद शेख शौकत वय ४३ वर्षे ६) शेख हमीद शेख अमीर वय ४० वर्षे ७) शेख मुस्ताक खान अमीर खान वय ६० वर्षे सर्व रा. कासोदा ता. एरंडोल जि.जळगाव अशांचा समावेश असुन त्यांचे अंगझडतीत व घोळक्यातुन ३३८०/- रुपये रोख, २२०००/- रुपये किमंतीचे मोबाईल व १,४०,०००/- रुपये किमंतीच्या ३ मोटार सायकल असा एकुण १,६६,०३०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचेवर पोकॉ/१७१८ समाधान तोंडे यांचे फिर्याद वरुन सदर इसमाविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सर यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सपोनि.निलेश राजपुत, पोना/४५६ अकिल मुजावर, पोकॉ/१७१८ समाधान तोंडे, पोकॉ/३६० प्रशांत पगारे, पोकॉ/६८२ कुणाल देवरे, पोकॉ/१९९७ योगेश पाटील अशांनी केली आहे.