Ankush tv18 news network
यावल तालुका प्रतिनिधी( रविंद्र आढाळे)
महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार यावल तालुक्यात सेवा पंधरवडा “कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्याचे नियोजन केले असल्याची माहिती यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दि.17 ते 22 सप्टेंबर 2025, दि.23 ते 27 सप्टेंबर, आणि दि.28 ते 2 ऑक्टोबर 2025 अशा तीन टप्प्यांमध्ये तालुक्यातील महसूल थकबाकी मुक्ती मोहीम, जिवंत सातबारा, जिवंत रेशन कार्ड, शेत सुलभ योजना, पानंद रस्ते, दफनभूमी / स्मशानभूमी, महासमाधान शिबिर, शेतकरी आत्महत्या कुटुंब यांना सर्व लाभदेणे, महाविद्यालयीन शिबिरे घेऊन दाखले वितरण कार्यक्रम. वर्ग 2 ते वर्ग 1 रुपांतरण, सामाजिक अर्थसहाय्य योजना मुद्दा क्रमांक 11 नुसार कार्यवाही करणे. इत्यादी सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे नियोजन यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.