Home » क्राइम>कायदा व नियमांचे उल्लंघन|राष्ट्रीय|क्राइम>शिक्षा व दंडनिहाय तरतूद » अमळनेर पोलीसांच्या हाती लागला अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल विक्री व खरेदी करणारे

अमळनेर पोलीसांच्या हाती लागला अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल विक्री व खरेदी करणारे

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

अमळनेर शहरातील अमळनेर चोपडा रोडावर एक इसम हा गावठी बनावटीचे पिस्टलची व्यापार करण्याच्या व्यावसायिक उददेशाने दुस-या एका इसमास विक्री करीता येणार आहे. यावरुन मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे अन्वेषण पथकातील पो.उप.नि./नामदेव आनंदा बोरकर, पो.ह.क्र.1998/मिलिंद अशोक सोनार, पो.शि.क्र. 1870/उदय राजेंद्र बोरसे व पो.शि.क्र.1311/निलेश सुभाष मोरे अशांना सोबत घेवुन खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता अमळनेर शहरातील चोपडा रोड परिसरात जावुन बातमीतील इसमांचा शोध घेत असतांना संत आसाराम बापु आश्रम समोर रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन इसम पोलीसांना पाहुन पळू लागल्याने त्यांना वर नमुद पोलीस पथकाने मोठ्या शिताफिने 22.30 वा. च्या सुमारास पकडुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नाव आरोपी क्र.01) विशाल भैय्या सोनवणे, वय 18 वर्षे, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर व आरोपी क्र.02) गोपाल भिमा भिल, वय 30 वर्षे, रा. सत्रासेन, ता. चोपडा, जि. जळगाव असे सांगितले. पोलीसांनी वर नमुद दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्टल, सहा जिवंत काडतुसे व दोन मोटर सायकली अशांसह मिळुन आले म्हणुन त्यांना त्यांचेकडे मिळुन आलेल्या बंदुकींचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले आहे. वरील दोघे इसमां कडेस मिळुन आलेल्या वस्तुंचे वर्णन खालील प्रमाणे-

01) 60,000/- रुपये किमतीच्या गावठी बनावटीच्या दोन पिस्टल.

02) 6,000/- रुपये किमतीचे सहा जिवंत काडतुस.

03) 1,00,000/- रुपये किमतीच्या दोन मोटर सायकली.

तरी वर नुमद आरोपीतांकडे एकुण रु.1,66,000/- किमतीचा मुददेमाल बनावट पिस्टलींसह मिळुन आल्याने त्यांचेवरुिध्द पो.शि.क्र.2826/विनोद किरण संदानशिव, नेमणुक अमळनेर पोलीस स्टेशन यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवुन फिर्याद दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशन, गु.नो.क्र. 0352/2025, शत्र अधिनियम कलम 3, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे दि.29/08/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.नि./नामदेव आनंदा बोरकर हे करीत आहे.

सदर कारवाई श्री. डॉ. महेश्वर रेडडी, पोलीस अधिक्षक, जळगाव व सौ. कविता नेरकर, मा. अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परिमंडळ, चाळीसगाव तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर श्री. विनायक कोते यांचे सुचना व मार्गदर्शनखाली अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

अमळनेर पोलीस स्टेशन हददीत सध्या सर्वत्र गणेशात्सव व आगामी ईद ऐ मिलाद तसेच इतर सण उत्सव साजरे होणार आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये जिल्हाभरात तलवारी व अग्निशखे तसेच प्राण घातक हत्यारांसह जमावात सामिल होण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. करीता कोणीही इसम बेकायदेशिर पणे कोणतेही अग्निशने तसेच प्राण घातक हत्यार बाळगत असल्यास त्याची गोपनिय माहिती पोलीसांना कळवावी. सदर इसमावर प्रचलित कायदान्वये कारवाई करण्यात येइल. व बातमीदाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा