Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » नाशिक “कहाणी खरात च्या पाळलेल्या 20 फुट नागाची” दिस इज द रिअल कहाणी. हे असं झालेलं आहे ह्या भामट्याचं.

नाशिक “कहाणी खरात च्या पाळलेल्या 20 फुट नागाची” दिस इज द रिअल कहाणी. हे असं झालेलं आहे ह्या भामट्याचं.

ankush tv18 news network

nashik –

“कहाणी खरात च्या पाळलेल्या 20 फुट नागाची”

नाशिक वेगवेगळ्या दोष निवारणासाठी प्रसिद्ध आहे. लोक भारतभरातून येऊन त्या पवित्र स्थळावरती नाग-सर्प पूजा वगैरे करतात. नेमक्या ह्या मानसिकतेचा ह्या भामट्याने इतका जबरदस्त उपयोग करून घेतला. हा काय करायचा, रोज संध्याकाळी ६-६.१५ ला अंधार पडला की सर्प पूजा घालायचा.

आणि त्यासाठी हे भक्तगण आणून बसवायचा आणि ही खरी कहाणी आहे. ही खरी कहाणी मी व्हेरिफाय पण केली पोलिसांकडून. ते म्हणाले की हे आम्हाला कळलंय बरं पण ते रेकॉर्डवरती नाहीये. मग काय करायचं? तर ते भक्तगण आले की हा ध्यान-धारणा करायला लागायचा आणि सापाचा तो धावा करायला लागायचा नागराजाची.?

तो नागराजाची धावा करत असताना २० फूट लांबीचा साप तो ज्या ठिकाणी बसलेला असायचा तिथे यायचा. आणि तो नुसता यायचा नाही हो, तो असा जमिनीवरती फणा काढायचा, डोलयला लागायचा वगैरे. बघणाऱ्यांची गाळण उडायची. अनेक जणांनी त्यांच्या वस्त्रामध्ये लघुशंका केली.

आणि मग हे लोक इतका हा महाराज सापाला, नागराजाला वश करू शकतो हे लक्षात येऊन मग याच्या कच्छपी लागायचे. आता ह्यातल्या दोघा-तिघांनी जे ह्याच्यात बळी पडले त्यांच्या लक्षात आलं की तो नागच खोटा आहे. राईट? कागदी आणि काही नागाची कातडी वगैरे वापरून त्यानं तो नाग केला होता. त्याचा रिमोट कंट्रोल ह्या भामट्याच्या हातात होता आणि तो ड्रोनची जी मशीन असते, म्हणजे ड्रोन सारखीच कुठलीतरी मशीन त्या नागाच्या ह्याच्यात टाकायचा आणि तो नाग असा डुलत मग तो असा फणा काढून यायचा तेव्हा हे मूर्ख लोक भुलायचे …ते नाग खरं की खोटं आणि समोर आहे भाई, सहाजिक आहे कोणालाही साधा छोटा साप जरी दिसला तरी आपली भीतीने गाळण उडते कारण साप आणि मृत्यू असं ते गणित आहे. आणि हा तर २० फुटाचा नाग काढायचा ना!

आणि मग तो नाग तो त्याच्या स्वतःच्या रिमोट कंट्रोलच्या मदतीने त्या नागाला डोलायला लावायचा आणि एका विशिष्ट वेळेनंतर तो नाग निघून जायचा, लोक घाबरलेले असायचे आणि ते ह्याला बळी पडायचे. दिस इज द रिअल कहाणी. हे असं झालेलं आहे ह्या भामट्याचं.

आणि म्हणून या सगळ्या भामट्याच्या ह्या अशा थोतांड कहाणीला हे लोक भुलले. अनेकांना बदली हवी होती, अनेकांना नोकरी हवी होती, अनेकांना चांगला श्रीमंत नवरा हवा होता, अनेकांना अनुरूप नवरा हवा होता, अनेकांच्या संसारात काही प्रॉब्लेम होते, अनेकांच्या संसारात ह्याने बिब्बे घातले आणि त्याच्यातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती या भामट्याने जमा केली. थोडीथोडकी नाही दीड ते दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती.

हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये जर असे भामटे असतील तर केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे म्हणून नव्हे, पण या धर्मातल्या किंवा कोणत्याही धर्मातल्या सामाजिक सुधारणांचं काम ज्या महाराजांनी केलं त्यांच्या प्रतिमेलाच हा धक्का आहे. म्हणून अशांना तातडीनं अटक करून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्यांची रवानगी थेट पोलिसांत केली पाहिजे. भलेही अशा भामट्यांची संख्या काही हजाराच्या घरात गेली तरी चालेल.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा