Home » ताज्या बातम्या » यावल शहराला पाणीपुरवठा कोट्यावधी रुपयाच्या योजनेत फार मोठा घोळ ? ठेकेदार कोण..?

यावल शहराला पाणीपुरवठा कोट्यावधी रुपयाच्या योजनेत फार मोठा घोळ ? ठेकेदार कोण..?

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

देशमुखवाड्यात अशुद्ध पाणीपुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?

यावल दि.२९  शहरातील देशमुख वाड्यात आणि इतर अनेक ठिकाणी यावल नगर परिषदेमार्फत होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध,दुर्गंधीयुक्त,घाण,काळसर रंगाचा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी असताना,नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी याकडे यावल नगरपालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला असलेल्या देशमुखवाड्यात अनेक दिवसापासून यावल नगर परिषदेमार्फत नळ जोडणीच्या माध्यमातून जो अनियमित आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे तो गटारीतील घाण पाण्यासारखा होत असल्याने देशमुख वाड्यासह इतर अनेक ठिकाणी साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, घाण पाणीपुरवठा का आणि कशामुळे होतो.? याकडे यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असले तरी याबाबत अनेकांनी तोंडी लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा यावल नगरपालिका शुद्ध पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.यावल नपाचे माजी नगरसेवक नगरपालिका संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक तक्रारी करीत असले तरी याकडे नगरपालिका कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.यावल शहरात अशुद्ध पाणीपुरवठा,अनियमित कचरा संकलन,यावल नगरपरिषदेमार्फत कचरा संकलन जो केला जातो त्याचे विलगीकरण केले जात नसताना ठेकेदाराचे बिल कोणत्या हिशोबाने काढले गेले.? याबाबत सुद्धा यावल शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.यावल नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराकडे तसेच नगरपालिका कार्यालय कार्यालयीन वेळेत अनेक वेळा मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख आढळून येत नसल्याची चर्चा यावल शहरात आहे.
यावल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपयाच्या नवीन योजनेअंतर्गत साठवण तलावापासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने या योजनेत फार मोठा घोळ असल्याची चर्चा दबक्या आवाजात असल्याने या कोट्यावधी रुपयाच्या कामाचा ठेकेदार कोण..? आणि तो ठेकेदार कुठला..? याबाबतचा खुलासा कामाच्या ठिकाणी फलक लावला नसल्याने समजून येत नाही.यावल नगर परिषदेमार्फत होणारी सर्व कामे पारदर्शक पद्धतीने कशी होतील याकडे आमदार अमोलभाऊ जावळे,यावल नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी आपले लक्ष केंद्रित करून कारवाई करायला पाहिजे असे यावलकरांमध्ये चर्चा आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा