पुणे प्रतिनिधी शंकर जोग.
पूर्वसूचना न देता झोपड्या तोडल्याने झोपडपट्टी सुरक्षा दलाचा संतप्त मोर्चा*
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कोणतीही च्या निषेधार्थ झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने जोरदार आणि बेधडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर येथून निघून पुणे महानगरपालिका शिक्षण भवन व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले. या मोर्चामध्ये काशिनाथ गायकवाड. महंमद शेख. दत्ता कांबळे, सुरेखा भालेराव, वैशाली अवघडे, वंदना पवार, गणेश लांडगे, संतोष कदम, नाना थोरात, सुनीता आडसुळ, अरुणताई तांगडे, श्रीनिवास आखाडे, तुषार मोरे, आबा चव्हाण यांच्यासह सुमारे ७०० ते ८०० स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
महाराष्ट्र झोपडपट्टी धारकांसाठी लागू असलेल्या महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन कायदा २०१५ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता दलितांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कलम ३ व ४ नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तसेच शासकीय गायरानवरील झोपड्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून निर्णयाची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली.
याच मोर्चात डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फर्ग्युसन महाविद्यालयात गेली दहा वर्षे काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन, वैद्यकीय सुविधा, पीएफ, ग्रॅज्युएटी आदी लाभ नाकारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. किमान वेतन अधिनियम १९४८, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ व कंत्राट कामगार कायदा १९७० चे उल्लंघन झाल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून टाळा यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राऊत यांच्याशी बैठक घेण्यात आली. दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लेखी करारनामा करून कर्मचाऱ्यांना योग्य लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले. पुणे आयुक्त नवल किशोर राम, सहाय्यक मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग शिवाजी जाधव, यांना निवेदन देण्यात आले,




