Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » युथ फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना फळ वाटप, व मिठाईवाटप.

युथ फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना फळ वाटप, व मिठाईवाटप.

Trending Photos

पुणे प्रतिनिधी – शंकर जोग.

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त व संगीता अर्जुन गायगवळी युथ फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना फळ वाटप, व मिठाईवाटप.

दलित पॅंथर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त व संगीता अर्जुन गाय गवळी युथ फाऊंडेशनच्या वतीने सॅलिसबरी पार्क येथे द सॅल्वेशन आर्मी होप हाऊस मधील विद्यार्थ्यांना फळ वाटप आणि मिठाईवाटप माजी नगरसेवक डॉ भरत वैरागे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन दलित पॅंथरचे पुणे शहर युवक अध्यक्ष व संगीता अर्जुन गायगवळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश गायगवळी यांनी केले होते, या प्रसंगी प्रमुख पाहुणे द सॅल्वेशन आर्मी होप हाऊस चे व्यवस्थापक मेजर सर्जेराव काळ पुंड, मंदा काळपुंड, दलित पॅंथरचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष राहुल साळुंके, हरीश कोंढाळकर पश्चिम महाराष्ट्र संघटक आरपीआय, शलमोन पुणेकर, अजय पुडगे, हिराप्पा कांबळे, सन्मयक गायगवळी, सचिन घोलप, अरविंद गायकवाड, सिद्धाप्पा नाटेकर, आदि यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा