ankush tv18 news network
Jalgaon
जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ – प्रारूप मतदार याद्यांतील व्यापक त्रुटी दूर करण्यासाठी विशेष सर्वेक्षण पथक नियुक्त करण्याबाबत आज भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर तर्फे महापालिका सहाय्यक आयुक्त सौ.धनश्री शिंदे मैडम यांना निवेदन देण्यात आले.


जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता प्रारूप मतदार याद्या दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाल्या असून त्यांचे परीक्षण करताना अत्यंत गंभीर व प्रणालीगत स्वरूपाच्या त्रुटी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदली जाणे, एकाच व्यक्तीची नावे दोन ते तीन ठिकाणी दिसणे, मतदारांच्या छायाचित्रांतील स्पष्ट चुका, संपूर्ण कुटुंबच चुकीच्या प्रभागात स्थलांतरित दाखविण्यात येणे, तसेच मृत व्यक्तींची नावे अद्यापही मतदार यादीत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या व्यापक त्रुटी झालेल्या असुन यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दुरुस्ती करण्यासाठी संबंधित फॉर्म उपलब्ध करून दिला असला, तरी त्या फॉर्ममध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतःची संपूर्ण माहिती भरावी लागत असल्याने ही प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊ ठरत आहे. विशेषत: जळगाव महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात साधारणपणे किमान २०००-३००० इतक्या त्रुटी आढळत असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येक नागरिकाने स्वतंत्रपणे फॉर्म भरून दुरुस्ती करणे वास्तव परिस्थितीत शक्य नाही. परिणामी अनेक नागरिकांना त्यांच्या नावावरील त्रुटी तातडीने दूर करणे कठीण जात आहे.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकविण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीविरहित असणे अत्यावश्यक आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत केवळ नियमित हरकतींवर आधारित दुरुस्त्या करून त्रुटी दूर करणे शक्य नाही, कारण त्रुटींचा व्याप अत्यंत मोठा असून प्रभागनिहाय सखोल प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये ‘‘मतदार यादी दुरुस्ती विशेष मोहीम’’ राबविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत मतदार याद्यांमधील दुरुस्तीकरिता हरकती घेण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी नम्र विनंती करण्यात आली. या पथकाद्वारे चुकीची नावे, दुबार नोंदी, चुकीचे प्रभाग, हरवलेली किंवा अद्ययावत करावयाची माहिती अशा सर्व बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करून अंतिम मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ, अचूक आणि विश्वासार्ह करणे अत्यावश्यक आहे. घरोघर सर्वेक्षण करणारे स्वतंत्र पथक नियुक्त करण्याचे आवश्यक आहे असे भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर च्या माध्यमातून सुचवण्यात आले.
या वेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दिपक प्रभाकर सूर्यवंशी सरचिटणीस नितीन इंगळे,सरचिटणीस राहुल वाघ,पितांबर भावसार,मिलिंद चौधरी, भूषण लाडवंजारी,रेखा वर्मा, गोपाळ पोपटानी,शक्ती महाजन, महिला मोर्चा प्रमुख नितु ताई परदेशी,मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे,दीपमाला काळे, विनोद मराठे,अजित राणे,अजित राणे, अतुल बारी जेष्ठ आघाडी प्रमुख महेश कापुरे, मा. नगरसेवक जितेंद्र मराठे, कैलास आप्पा सोनवणे, सौ.सुचिता ताई हाडा, अमित काळे,महेश चौधरी, अश्विन सैंदाणे,तिलोत्तमा पाटील, निलेश तायडे,धनंजय पाटील, सुनील भारंबे, दिनेश अत्तरडे,अमोल धांडे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





