Ankush tv18 news network
जळगाव: शहरातील एक तरुण रागाच्या भरात घरातून निघून गेला असून, गेल्या सात दिवसांपासून तो बेपत्ता आहे. या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाला असून, त्याच्या कुटुंबीयांनी तो लवकरात लवकर घरी परतावा यासाठी नागरिकांना मदतीचे भावनिक आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये दिसणारा तरुण कौटुंबिक कारणावरून रागावून घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला आहे. सात दिवस उलटूनही तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. तो कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असेल या विचाराने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
नागरिकांना मदतीचे आवाहन
फोटोमधील हा तरुण कोणालाही दिसल्यास किंवा त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास, कृपया खाली दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सुखरूप जळगावला परत आणण्यासाठी आपल्या मदतीची नितांत गरज आहे.
संपर्क क्रमांक:
प्रदीप तात्या: ९४२०३५०३९९
अशोक पा.: ८८३००४७२७२
तुमच्या एका फोनमुळे एका कुटुंबाला त्यांचा मुलगा परत मिळू शकतो. त्यामुळे, या तरुणाची माहिती मिळताच संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे.