Ankush tv 18 news network
जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार आणि पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी अनाधिकृत विक्रेत्यामार्फत नवीन वाहनांची विक्री होत असून प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून नवीन वाहन विक्री करण्यासाठी नियमानुसार कोणतेही व्यवसाय प्रमाणपत्र धारण न करता नवीन वाहनांची विक्री करण्याकरीता शोरूम उघडून शोरूम मध्ये नवीन वाहने उभे करून व्यवसाय सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त (धारण) केलेले अधिकृत वाहन वितरक यांनी एकाच नावाने, एकाच पत्त्यावर, एकाच कंपनीचे, एका पेक्षा जास्त (ट्रेड सर्टिफिकेट) व्यवसाय प्रमाणपत्र घेतलेले असून यांचा नवीन वाहनांची विक्री होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अनाधिकृत वाहन विक्रेते (सब डिलर) यांना विना नोंदणी वाहने विक्री करण्यासाठी पुरवितात व याचे मार्फत नवीन वाहनांची विक्री करून घेतात. अशा दोषी वाहन वितरकांच्या व्यवसाय प्रमाणपत्रावर केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ४४ नुसार व्यवसाय प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही तसेच अनाधिकृत वाहन विक्रेते (सब डिलर) यांचे विरूद्ध मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १९२ नुसार कायदेशीर कार्यवाही करून याचा अनाधिकृत शोरूम मधील सर्व वाहने जप्त करण्याची कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन गणेश कौतिकराव ढेंगे यांनी दिले आहे.