Home » महाराष्ट्र » सोने कारागीरचे दुकानाचे कोंडा तोडून सोन्याची चोरी करणाऱ्या इसमास अटक

सोने कारागीरचे दुकानाचे कोंडा तोडून सोन्याची चोरी करणाऱ्या इसमास अटक

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush tv18 news network

Jalgaon- ‘सोने कारागीरचे दुकानाचे कोंडा तोडून सोन्याची चोरी करणाऱ्या इसमास अटक

 

दि. 03/10/2025 रोजी पहाटे 03.30 वा ते 04.12 वाजेच्या दरम्यान बालाजी पेठ येथील निखिल कैलास गौड वय 30, व्यवसाय – सोने कारागीरी यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्स मध्ये इसम नामे बिस्वजीत बनेस्वर सासमल रा. वार्ड नं. 10, जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून कारागीर सुदर्शन माल याचे काम करण्याचे लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातून 124 ग्रॅम सोन्याची चोरी केली होती म्हणून त्याचेविरुध्द शनिपेठ पोलीस स्टेशनला गु.र.नं. 227/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (a), 331(4) अन्वये दि. 03/10/2025 रोजी दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांनी सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने घटनेच्या दिवशीचे सी.सी.टी.व्ही फुटेजवरून आरोपीताची खात्री केली. तसेच आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याची पत्नी हैद्राबाद येथे राहण्यास असल्याने दि. 04/10/2025 रोजी सायंकाळी हैदराबाद येथे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक केल्याचे तात्रिक विश्लेषणावरून निष्पन्न झाले त्यानुसार तात्रींक माहितीवरून आरोपीचे शोध कामी लावलेला सापळा यशस्वी होवून दि. 04/10/2025 रोजी आरोपी बिस्वजीत बनेस्वर सासमल रा. वार्ड नं. 10, जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल यास ताब्यात असून अधिक चौकशी करता सदर आरोपीताने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपीतास मा. न्यायालयात हजर करुन त्यास दि. 07/10/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्याने त्यास पोलीस कस्टडि रिमांडमध्ये गुन्ह्यात चोरी केलेल्या मालाबाबत तसेच चोरी करण्यासाठी वापरलेल्या साधनाबाबत विचारपूस करता त्याने खालील मुद्देमाल काढून दिलेला आहेत.

1) एकूण 13,99,000/-रुपये किमतीचे 124.06 ग्रॅम वजनाचे सोने (100% मुद्देमाल हस्तगत)

2) एक 18 इंच लांबीची कात्री (कटावणी)

3) एक लोखंडी पेन्चिस (पक्कड)

4) एक एक्झाब्लेड असे चोरी करण्यासाठीचे साधने

सदर कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो, अप्पर पोलीस अधिक्षक सो जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी सो जळगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रीमती कावेरी कमलाकर, तसेच API साजिद मंसूरी, PSI योगेश ढिकले, पोहेकॉ/2855 अल्ताफ पठाण पोहेकॉ/2834 प्रदिप नन्नावरे, पोहेकॉ/3106 योगेश जाधव, पोकॉ/936 योगेश साबळे, पोकॉ/1546 निलेश घुगे, पोकॉ/387 अमोल वंजारी पोकों / 1349 नवजीत चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोकॉ गौरव पाटील अशांनी केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा