Ankush tv18 news netwrok
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर पाऊस वर्षभरात कोणकोणत्या तारखेला पडणार आहे. हा हवामानाचा अंदाज आधीच कळायला हवा,असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगरचा जीवनसाधना पुरस्कार मिळाल्याबद्दल विजयअण्णा बोराडे यांचा डॉ.उत्तमराव इंगळे (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे, माजी संचालक, कृषी विस्तार) यांच्या हस्ते शनिवार ( दि. २० ) रोजी साई नाट्य मंदिरात कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.एस.एम.लोया होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख ( नांदेड ), रामराव रोडगे ( माजी मुख्य शास्त्रज्ञ पाणी व्यवस्थापन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ) यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संयोजन समितीचे गोविंदभाऊ जोशी प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, आश्रोबा डख, वल्लभ लोया, दत्तराव पावडे,पांडुरंगराव मगर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रम स्थळी केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थीनींच्या लेझीम सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. पुढे बोलताना विजय अण्णा बोराडे म्हणाले की,मातीचे महत्त्व जाणा. रासायनिक आणि नविन तंत्रज्ञानाच्या भरवशावर शेती करा. नव्या जुन्याची सांगड घालून पुढे जा. कोरोना काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सगळ्यांना सांभाळण्याची क्षमता ही केवळ शेती आणि खेड्यातच आहे.शेतीत अनेक आव्हाने आहेत. या शेतीतील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आणि शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक आहे.” असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. विजयअण्णा बोराडे यांचा परिचय गोविंदभाऊ जोशी यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन अशोक लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्तराव पावडे यांनी केले. अर्जुन कसाब, सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दिक्षित आणि गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत सादर केले. कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था, केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्था, यशवंत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, महेश खारकर, किशोरभाऊ, जोशी, मुकेशराव बोराडे, विनोद बोराडे, ज्ञानोबा बोराडे, चंद्रकांत बोराडे, उध्दव सोळंके, रामभाऊ शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, परभणी, सेलू, मानवत, माजलगाव, परतूर, मंठा, जिंतूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटीचा मजकूर…
विजयअण्णा बोराडे कृषी पंढरीचे वारकरी : श्रीकांत देशमुख
भूमीला ईश्वर मानणारी मूळ परंपरा शेतीची आहे. त्यामुळे शेती कशी असावी. शेतकरी स्वाभिमानी कसा होईल. याचे चिंतन करणारे विजयअण्णा बोराडे हे कामात ईश्वर शोधणारे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणारे, विद्यापीठाच्या कक्षेच्या पलिकडे जाऊन शेतीला वैभव प्राप्त करून देणारा माणूस आहेत. ते कृषी पंढरीचे वारकरी आहेत. शेतीचा चालता फिरता ज्ञानकोश आहेत. या ज्ञानकोशाची पाने उलगडून पाहावीत. हा कृतज्ञता सोहळा म्हणजे आजच्या भगीरथाचा सन्मान आहे. हा अण्णांच्या कार्याचा सन्मान आहे. असे ते म्हणाले.