Ankush tv18 news network
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती -राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाबतीत अर्वाचे शब्दात टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरातील डा. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांचा तीव्र निषेध करून त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले. यावेळी आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. आ.पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे तथा चपला मारुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य टिका करणाऱ्या आ.पडळकर यांचेवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भद्रावती तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. आ.पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अर्वाच्य टिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाज शेख, जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर, राजेश मत्ते, फैय्याज शेख,संजय आस्वले,सुनील महाले,सबीया देवगडे,आदी ऊपस्थीत होते.