Ankush tv18 news network
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड: सर्व महाराष्ट्रात काढण्यात आलेला जेलभरो आंदोलन बिलोली तालुक्यात तहसील कार्यालयावर धडकला लोकस्वराज आंदोलन व मातंग समाजा आरक्षण उपवर्गीकरणासाठी,काढण्यात आलेला जेलभरो आंदोलन तहसील,कार्यालय बिलोली येथे धडकला. अनुसूचित जाती आरक्षण,उपवर्गीकरण करण्यात यावे,अँड अविनाश कोंडामंगले राहणार,शिवपुरी ता हदगाव यांच्या वर प्राण घातक हल्ला करणारे,आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, याविषयी लोकस्वराज्य आंदोलन तालुका बिलोली शाखा,व मातंग समाज यांच्या,वतीने दिनांक 19 /9/2025 रोजी दुपारी 12:30 मिनिटांनी अनुसूचित जाती आरक्षण करण्यात यावे या मागणीसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी,सर्वोच्च न्यायालय निकाल देऊन.आरक्षणापासून ज्या जाती, वंचित आहेत अशा जातींच्या सर्वे,करून त्यांना त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्यात यावी, असे न्यायालयीन घोषित करून सुद्धा,महाराष्ट्र शासनाने, या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे म्हणून लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा,पासून ते तहसील कार्यालय,व पोलीस स्टेशन, येथे हजारोच्या संख्येने मातंग समाज हा मोर्चामध्ये सामील झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून,ते तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पर्यंत,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,व लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचा विजय असो या घोषणा देत,सर्व मातंग समाज लोकस्वराज आंदोलनाचे कार्यकर्ते, तहसील कार्यालय येथे बिलोली पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन,गंगाधर माधराव सिदलोन,संजय संभाजी हावगारे,यादव कुडकेकर,रमेश गाडेकर,महादेव एडके, गंगाधर भंडारे,साहेबराव एडकेवार,रमेश सोमवारे, हनुमत शिंदे हरनाळीकर, देवदास भंडारे,व पत्रकार मारोती एडकेवार,पत्रकार कृष्णापल्ले सायलू, व सर्व मातंग समाज उपस्थित सर्व समाज बांधव,महिला व लोकस्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते,यावेळी उपस्थित होते.