Ankush tv18 news network
जळगाव, दिनांक 19 सप्टेंबर महसूल व वनविभागाच्या ०१ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यभर सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील लोणारी मंगल कार्यालय येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सेवा पंधरवडा – नागरिकांसाठी नवे पाऊल!
सेवा पंधरवडा चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते भुसावळ तहसील कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त व सर्वसुविधा संपन्न इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन इमारतीमुळे भुसावळ तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामकाजासाठी आधुनिक, सुबक व सुलभ वातावरण मिळणार आहे.
प्रशस्त हॉल्स
आधुनिक सुविधा
सोयीस्कर व्यवस्था
यामुळे शासकीय सेवा अधिक वेगवान व पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचतील.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने सर्व नागरिकांना आवाहन आहे की, या सुसज्ज तहसील कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शासकीय सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा.
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री, संजय सावकारे यांच्या हस्ते, भुसावळ तहसिल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, तहसिलदार निता लबडे , नगरपरिषदचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले उपस्थित होते.
सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत भुसावळ तालुक्यातील एकूण २१ शासकीय विभागांमधील २५३ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच ९९८ नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा याचा लाभ घेतला.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांनी महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, पोलीस, सामाजिक न्याय, कृषी आदी विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.