ankush tv18 news network
वर्धा जिल्हा प्रतिनिधी.
अमोल येसनकर. अकोट जिल्हा
दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला जिल्ह्यातील दाबकी रोड भागात अत्यंत संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. केवळ १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे कुटुंबीय गणेश विसर्जनाकरिता घराबाहेर असताना तो ही समीर नावाच्या नराधमाने घरात घुसून त्या बालिकेवर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित व तिच्या कुटुंबास जीवाने ठार मारण्याची धमकी दिली.
सदर घटना केवळ निंदनीयच नाही तर ती संपूर्ण समाजमनाला हादरवणारी आहे. विशेष म्हणजे सदर आरोपी हा यापूर्वीही अशा गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगून आलेला असून, सध्या तो फरार असल्याचे कळते. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी देवळी पोलीस ठाण्यात, ठाणेदार साहेब मा. श्री शिवराजजी जाधव यांना निवेदन देण्यात आले.
आणि हे निवेदन मुख्य मंत्र्यांपर्यंत पोहचावी ही विंनती ठाणेदार साहेबांना केली.
त्या अनुषंगाने, ठाणेदार साहेबांकळे खालीलप्रमाणे ठोस मागण्या केल्या.–
१) सदर आरोपीस तात्काळ शोधून अटक करण्यात यावी.
२) बलात्कारासारख्या अमानुष कृत्यासाठी कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी.
३) पीडित बालिका व तिच्या कुटुंबीयांना त्वरित सरकारी संरक्षण व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
४) अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता अकोला शहरात व जिल्ह्यात पोलीस गस्त व सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात यावी.
५) घटनेचा जलदगती न्यायालयात पाठपुरावा करून आरोपीस उदाहरणार्थ शिक्षा देण्यात यावी.
सदर प्रकरणात योग्य ती तात्काळ कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती सद्रकर्त्यांनी केली.
सादरकर्ते.
अमोल येसनकर, विपुल पाटील, आशिष जांचक, अमोल ठाकरे, रविंद्र पारीसे, रविंद्र भानारकर, जगदीश मांढरे, मनोज शिवरकर, रमेश पचारे.
1.महर्षी वाल्मिकी भोई समाज, देवळी.
2.विदर्भ भोई समाज संघटना.
3.युवा ग्रामीण पत्रकार संघ, वर्धा.
या संघटनेचे व संघाचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते उपस्तित होते