Home » ताज्या बातम्या » स्थानीक गुन्हे शाखा जळगाव ची अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई…

स्थानीक गुन्हे शाखा जळगाव ची अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई…

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

स्थानीक गुन्हे शाखा जळगाव ची अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई…

 

जळगाव जिल्ह्यात तसेच शहरात अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधीक्षक जळगाव, यांनी स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांना आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने श्री संदीप पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव शहरात तसेच जिल्हयात अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकामी स्थानीक गुन्हे शाखेच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना आदेशीत केले होते.  त्याअनुशंगाने स्थानीक गुन्हे शाखेच्या चोपडा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिंनाक १६/०७/२०२५ रोजी चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत वाहतुक करणारा इसम मिळुन आला होता. त्यास नमुद ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत ताब्यात घेऊन त्याच्यावर चोपडा शहर पोलीस ठाणे गु.र.क्रं.४३४/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तसेच स्थानीक गुन्हे शाखेच्या चाळीसगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिनाक २४/०७/२०२५ रोजी मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळुने भरलेला ट्रैक्टर व ट्रॉलीसहीत वाहतुक करणारा इसम मिळुन आला होता. त्यास नमुद घेऊन मा. पोलीस निरीक्षक मेहुणबारे पोलीस ठाणे यांना सदरचे ट्रॅक्टर व त्याच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याकामी ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच स्थानीक गुन्हे शाखेच्या जळगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिंनाक ०७/०८/२०२५ रोजी विनापरवाना अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत वाहतुक करणारा इसम रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील गणपतीनगर परीसरात मिळुन आला होता. त्यास नमुद ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत ताब्यात घेऊन मा. तहसिलदार सो जळगाव यांना सदरचे ट्रॅक्टर व त्याच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याकामी लेखी रिपोर्ट देऊन, सदरचे ट्रॅक्टर मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या कार्यालयाच्या आवारात सुरक्षित रित्या लावण्यात आले आहे.

तसेच स्थानीक गुन्हे शाखेच्या जळगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी दिंनाक ०८/०८/२०२५ रोजी रोजी विनापरवाना अवैध वाळुने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक क्रंमाक MH१९८२१९१ वाहतुक करणारा इसम जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीतील मानराज पार्क राष्ट्रीय महामार्गावर मिळुन आला होता. त्यास नमुद ट्रकसहीत ताब्यात घेऊन मा. तहसिलदार सो जळगाव यांना सदरचे ट्रक व त्याच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याकामी लेखी रिपोर्ट देऊन्, सदरचा ट्रक मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या कार्यालयाच्या आवारात सुरक्षित रित्या लावण्यात आले आहे.

तसेच स्थानीक गुन्हे शाखेच्या पाचोरा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिंनाक ०७/०८/२०२५ रोजी भडगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळुने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत वाहतुक करणारा इसम मिळून आला होता. त्यास नमुद ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत ताब्यात घेऊन मा. पोलीस निरीक्षक भडगाव पोलीस ठाणे यांना सदरचे ट्रॅक्टर व त्याच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याकामी ताब्यात देण्यात आले आहे.

अशापध्दतीने गेल्या महीनाभरात स्थानीक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध वाळु वाहतुक करणारे ०४ ट्रॅक्टर तसेच ०१ ट्रक असे एकुण ०५ वाहनावर कारवाई केली असुन, सदरची मोहीम येणाऱ्या दिवसात अजुन तीव्र करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री. अशोक नखाते सो. अपर पोलीस अधीक्षक जळगाव भाग, तसेच मा.श्रीमती कविता नेरकर सो. चाळीसगाव भाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, यांच्या अधिनस्त स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा