Ankush tv18 news network
अमोल राजेंद्र पाटील (ग्राम रोजगार सेवक), सद्य सरपंच पती, तसेच त्यांचे सहकारी व शेळावे खुर्द गावाचे ग्रामसेवक साहेब यांनी एकत्र येऊन गोरगरिबांच्या नावाने रोजगार हमी, निराधार, अपंग, विधवा, अनुसूची जातीत जमातीतील महिलांशी संपर्क साधून घरकुल योजना, रोजगार हमी योजनेचे पैसे व इतर शासकीय कामात मदत करण्याचे अमिष दाखावून १० हजार ते १५ हजार रोखीने घेतले व कोणत्याही योजनेचा लाभ दिला नाही. अश्या प्रकारे गरीब महिलांची फसवणूक ग्रामरोजगार सेवक (सरपंच पती) अमोल राजेंद्र पाटील याने केलेली आहे. आणि घरकुल व रोजगार सेवक यांचा नागरिकांच्या बँक खाते आलेला पैसा देखील परस्पर अमोल राजेंद्र पाटील यांनी बँकेतून नागरिकांचा पैसा काढून घेतला आहे, या मध्ये फक्त नागरिकांची नाही तर शासनाची आणि बँकांची देखील फसवणुक या प्रकाराबाबत नागरिकांनी विचारणा केली असता अमोल राजेंद्र पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. ?
. दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी गावातील ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत, महिला नागरिकांनी संबंधित विषयावर विचारणा केली असता, अमोल राजेंद्र पाटील यांनी महिलांना हात पकडून सभेतून बाहेर काढले आणि अश्लील स्वरूपात शिवीगाळ केली. तसेच, सर्व समाजाचा उल्लेख करून जातीय स्वरूपाची शिवीगाळ केली गेली. या घटनेसंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी पारोळा पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली असता, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.”
सदर बाब पारोळा पोलीस स्टेशन येथे तक्रार स्वरूपात सादर करण्यात आली असूनदेखील आजतागायत अमोल राजेंद्र पाटील आरोपींविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
या गंभीर गैरव्यवहारामध्ये काही शासकीय अधिकारी व राजकीय नेते व कार्यकर्ते देखील सामील असल्याची शंका असून, तपासात आणखी आरोपी उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. व तसेच हा अपहार अनेक अधिकारी व व्यक्ती मिळून झालेला आहे . शेळावे गावामध्ये झालेली ही घटना अत्यंत लाजिरवाणी असून, गोरगरिबांच्या हक्कांवर होणारा अत्याचार, दडपशाही व हुकूमशाही हा प्रकार आता थांबणे आवश्यक आहे. वरील आरोपींवर तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी. शासकीय योजनांचा निधी हडपून केलेली फसवणूक व बेकायदेशीर कृत्यांबाबत सखोल चौकशी करण्यात यावी. तपासामध्ये सामील असलेल्या शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पीडित गोरगरीब नागरिकांना संरक्षण व न्याय मिळवून द्यावा. “कारण घटनेची तक्रार करत असलेल्या व्यक्तींवर अमोल राजेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सातत्याने दडपशाही केली जात आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. हा प्रकार करून आरोपी अशी अपेक्षा ठेवतात की, पीडित व्यक्ती आपली तक्रार मागे घेतील.” पमाबाई उर्फ आशाबाई एकनाथ भील, मु.पो. शेळावे खुर्द, ता. पारोळा, जि. जळगाव अशा आशयाचे निवेदन पारोळा पोलीस स्टेशनला आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे