Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन धडक करणाऱ्यांवर कडक नाकाबंदी करून कारवाई

विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन धडक करणाऱ्यांवर कडक नाकाबंदी करून कारवाई

ANKUSH TV18 NEWS NETWORK

JALGAON

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या ‘विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत ११०० हून अधिक वाहनांवर धडक कारवाई; १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल.

जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचपा बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दि. २४/१२/२०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ (Special Vehicle Checking Drive) राबविण्यात आली.

या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने (Without Number Plate) आणि अल्पवयीन वाहन चालक (Underage Drivers) यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.


दि. २४/१२/२०२५ रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेतील कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
या मोहिमेत एकूण ११०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण १३,७१,४५०/- (तेरा लाख एकाहत्तर हजार चारशे पन्नास रुपये) तडजोड शुल्क (दंड) वसूल करण्यात आला आहे.
कारवाईचे वर्गीकरण:
१. विना नंबर प्लेट केसेस (Without Number Plate):
नंबर प्लेट नसलेल्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या एकूण ४६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४,४५,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
२. अल्पवयीन वाहन चालक केसेस (Underage Driving):
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या एकूण १०७ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ४,०४,५००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नये, याबाबत पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
३. इतर केसेस (Other MV Act Cases):
इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ वाहनांवर कारवाई करून ५,२१,९५०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ठळक कामगिरी:
सदर मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा