Latest News
शालेय मुलाने ChatGPT ला मित्राची गंमत करण्यासाठी असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप, अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.. अकोट   जिल्हा पेठ पोलीस स्टेशन च्या मुख्य रस्त्यावर टू व्हीलर खरेदी विक्री करणाऱ्या एजंटांच्या गाड्यांची विक्री -वाहतूक कोंडी गंभीर -बेकायदेशीर वाहनांचे अड्डे   – नागरिक त्रस्त; संकल्प पॅनलचा दणदणीत विजय! परिवर्तन, पारदर्शकता आणि विश्वासाचा उत्सव!
शालेय मुलाने ChatGPT ला मित्राची गंमत करण्यासाठी असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप, अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.. अकोट   जिल्हा पेठ पोलीस स्टेशन च्या मुख्य रस्त्यावर टू व्हीलर खरेदी विक्री करणाऱ्या एजंटांच्या गाड्यांची विक्री -वाहतूक कोंडी गंभीर -बेकायदेशीर वाहनांचे अड्डे   – नागरिक त्रस्त; संकल्प पॅनलचा दणदणीत विजय! परिवर्तन, पारदर्शकता आणि विश्वासाचा उत्सव!

Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » ” एल. के. फॉर्म हाऊसवर छापा – विदेशी नागरिकांच्या फसवणूक प्रकरणी – “कोणी केली तक्रार व गुन्हा दाखल !

” एल. के. फॉर्म हाऊसवर छापा – विदेशी नागरिकांच्या फसवणूक प्रकरणी – “कोणी केली तक्रार व गुन्हा दाखल !

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush tv18 news network -विदेशी नागरिकांच्या फसवणूक प्रकरणी -” एल. के. फॉर्म हाऊसवर छापा “कोणी केली तक्रार व गुन्हा दाखल !

जळगाव – शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी रविवारी छापा टाकून ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने चालविल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या प्रकरणी, सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असलेल्या कोल्हे यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जळगाव-ममुराबाद या दिवस-रात्र वर्दळ असलेल्या रस्त्यालगत कोल्हे परिवाराची मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्याच ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नखाते यांनी रविवारी दुपारच्या सुमारास कोल्हे यांच्या  एल.के. फार्म हाऊसवर छापा टाकला.

पोलिसांनी अचानक धाड टाकली असता, त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अट केलेले संशयित हे कोलकाता येथील रहिवाशी आहेत.

दरम्यान, जळगाव पोलिसांनी चौकशीसाठी फार्म हाऊसचे मालक माजी महापौर ललित कोल्हे यांना सुद्धा ताब्यात घेतले आहे. शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या कोल्हे यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईनंतर जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आजोबा, वडील, काका यांचा राजकीय वारसा चालवित असताना कोल्हे यांनी मनसेच्या माध्यमातून सक्रीय राजकारणाची सुरूवात केली होती.

विधानसभेचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतरची २००९ ची पहिली निवडणूक देखील त्यांनी लढली होती. मात्र, पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये जळगाव शहरातून मनसेची उमेदवारी केली. त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी जळगावात सभाही झाली होती. परंतु, कोल्हे यांचे आमदारकीचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.

पोलिसांनी आज ललित कोल्हे यांच्या ममूराबाद रस्त्यावरील एल. के. फॉर्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी बनावट कॉल सेंटर होतं याचा खुलासा झाला. हे कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी-विदेशी नागरिकांचे लाखो रुपये लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे फॉर्म हाऊसमधून तब्बल 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असलेले कोल्हे हे जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच, त्यांच्या फार्म हाऊसवर ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने चालविल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला. काही वर्षांपूर्वीही कोल्हे यांच्या त्या वादग्रस्त फार्म हाऊसवर जुगार अड्डा चालविला जात असल्याचे उघडकीस आल्याने मोठी पोलीस कारवाई झाली होती.

पोलिसांच्या या कारवाईनंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असं काही सुरु असेल अशी कुणाला कल्पनादेखील नव्हती. फॉर्म हाऊसवर सुरु असणाऱ्या बनावट कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाची व्याप्ती किती आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी आहेत, या प्रकरणात ललित कोल्हे यांना आणखी कुणाचा वरदहस्त होता का? याचाीदेखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलीस तपासातून या प्रकरणाची सविस्तर माहिती समोर येऊ शकते.

दरम्यान, ललित कोल्हे हे आधी मनसे पक्षाशी संबंधित होते. ते 2018 मध्ये भाजपसोबत संलग्न झाले. त्यांची सप्टेंबर 2017 मध्ये जळगावचे महापौर म्हणून निवड झाली होती. तसेच त्याआधी ते मनसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्याने जळगाव महापालिकेचे उपमहापौर बनले होते. याशिवाय त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये मनसेच्या तिकीटावर आमदारकी लढवली होती. पण त्यांना अपयश आलं होतं. ते जळगावच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून मानले जातात. त्यामुळे त्यांच्याबाबत संबंधित प्रकार समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.

आमदारकीचा नाद सोडून ललित कोल्हे यांनी नंतरच्या काळात जळगाव महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे तब्बल १२ नगरसेवक महापालिका निवडणुकीत विजयी झाले. तरीही कोल्हे २०१७ मध्ये खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्याने जळगावचे महापौर बनले. मनसेची शिडी वापरून महापौर पदापर्यंत मजल मारल्यावर २०१८ मध्ये मात्र कोल्हे यांनी काही नगरसेवकांना बरोबर घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात, भाजपमध्येही ते जास्त दिवस थांबले नाहीत.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा
0
Would love your thoughts, please comment.x
()
x