हैदराबाद, Ankush tv18 News न्यूज नेटवर्क.
तेलंगणातील करीमनगर येथे एका धक्कादायक हत्याकांडाने सर्वांना हादरून सोडले आहे. रमादेवी या महिलेने आपला पती संपत याची केली. विशेष म्हणजे हत्येची ही क्रूर पद्धतिने यूट्यूबवरून शिकली. संपत हा एका ग्रंथालयात सफाई कामगार होता आणि त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी पत्नी रमादेवीशी भांडण करायचा. रमादेवीला पतीपासून मुक्ती हवी होती. यासाठी तिने यूट्यूबवर शोध घेतला आणि एका व्हिडीओतून कानात कीटकनाशक ओतून हत्या करण्याची पद्धत शिकली. तिने हा भयंकर कट प्रियकर राजय्या आणि त्याचा मित्र श्रीनिवास यांच्यासोबत आखला. हत्येच्या रात्री त्यांनी दारू पिण्याच्या बहाण्याने संपतला बोम्मक्कल उड्डाणपुलाजवळ बोलावले. नशेत जमिनीवर पडलेल्या संपतच्या कानात राजय्याने कीटकनाशक ओतले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर रमादेवीने पोलिसात बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवली, जणू तिला काहीच माहीत नाही.