Ankush tv18 news network
यावल दि.१८ ( सुरेश पाटील )
यावल शहरात बाजारपेठ मध्ये एकमेव असलेली पुरुषांच्या मतारीची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मुतारीची साफसफाई होत नसल्याने एका धार्मिक स्थळापर्यंत तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानापर्यंत दुर्गंधी पसरली असल्याने व्यापारी, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मुख्यालयी उपस्थित राहत नसून ९० टक्के शासकीय कामानिमित्त कार्यालयाच्या बाहेर राहत असल्याने नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर तसेच साफसफाई करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर ठेकेदारांवर नियंत्रण नसल्याने नगरपालिकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे याकडे प्रशासक तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार यांनी लक्ष केंद्रित करून कार्यवाही नव्हे तर कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
नगरपरिषद हद्दीत असलेल्या मोजक्या काही ठिकाणच्या मुताऱ्यांची आणि शौचालयांची दैनंदिन साफसफाई होत नसल्यामुळे दुर्गंधीमुळे स्री – पुरुष, तरुण मंडळी नागरिक हैराण झाले आहेत. ( डुकरी नाल्यातली मुतारी मुख्याधिकारी यांनी बघितल्यास त्यांच्या लक्षात येईल ) मुतारी, शौचालय साफ करण्यासाठी जी यंत्रणा कार्यरत आहे त्याकडे मुख्याधिकारी यांचे आणि स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शहरात नवीन सिमेंट काँक्रीटचे ढापे ज्या कॉन्ट्रॅक्टरने बांधकाम केले त्या कॉन्ट्रॅक्टरने आपल्या सोयीनुसार मजुरांकडून निकृष्ट प्रतीचे मटेरियल वापरून बांधकाम केले,तसेच मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे बांधकाम नाही ( सातोद येथील त्या ठेकेदाराबद्दल यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ) याकडे नगरपरिषद बांधकाम विभागाने बांधकाम प्लॅन, मंजूर इस्टिमेट प्रमाणे केले आहे किंवा नाही याची खात्री केली नसली तरी ठेकेदारांना वेळेवर पेमेंट दिले जाणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावल शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ती साफसफाई होत नसल्याने नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यावल नगरपरिषदेच्या कारभाराकडे प्रशासक तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी यावल तहसीलदार यांच्यामार्फत प्रत्यक्ष ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी करून कार्यवाही न करता कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.