ANKUSH TV18 NEWS NETWORK
JALGAON
जिल्हापेठ पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक हे सदर गुन्ह्यातील गेली मोटार सायकल हिचा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की, मध्यप्रदेश मधील विनेश बरडे नावाचा इसम हा सदया चिंचोली, कुसुंबा गावाकडे राहत असून त्याने मोटार सायकल चोरी केली आहे. त्याने मेंहदी रंगाचा २ पॉकीटचा शर्ट व निळया रंगाची जिन्स घातलेला इसम हा डि मार्ट जवळ उभा आहे असे सांगीतले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक असे तात्काळ डि मार्ट जवळ जावून नमुद वर्णना प्रमाणे संशयीताचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विनेश चंपालाल बरडे, वय ३०, रा.अंजनगाव ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश. ह.मु. कुसंबा पेट्रोलपंप जवळ चिंचोली ता.जि. जळगाव असे सांगीतले होते. त्यावरून तपासी अमंलदार पोह १३०२ शरीफ रहिम शेख, नेम. जिल्हापेठ पो.स्टे. यांनी सदर आरोपीतास गुन्ह्याकामी अटक करून मा. न्यायालयाकडून त्याचा २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोह महेश महाजन, नरेश सोनवणे, शरीफ शेख, तेजस मराठे, अमीतकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, विकास पहुरकर, प्रशांत लाड सर्व नेम. जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
सदरची कारवाई ही मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री नितीन गणापुरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, मा. प्रदीप ठाकूर पोलीस निरीक्षक, यांचे मागदर्शनाखाली करण्यात आली आहे.