ANKUSH TV18 NEWS NETWORK
सावनेर /केळवद :
संजना जाधव प्रशासकीय कामात गैरवर्तन तसेच दस्त नोंदणी प्रक्रियेत शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी सावनेर येथील दुय्यम निबंधक संजना एस. जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी ही कारवाई केली.जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शासनाच्या १२ लाख ६१ हजार २७१ रुपयांचा महसूल बुडाल्याचा प्राथमिक ठपका चौकशी समितीने १२ लाख ६१ हजार महसूल बुडविल्याचा चौकशी समितीचा उपका आहे. सावनेरचे आ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत २८ ऑगस्ट रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाची अचानक पाहणी केली होती. या पाहणीत कार्यालयात केवळ एक कंत्राटी व्यक्ती हजर असल्याचे पाहून ‘यापेक्षा आणखी कोणता वाईट अनुभव लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून घ्यावा?’ असा उद्विग्न सवाल बावनकुळे यांनी केला होता. तसेच येथे खासगी व्यक्ती कार्यालयीन कामकाज करत असल्याचे निदर्शनास आले होते. यावर बावनकुळे यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुर्दाक उपनियंत्रक नागपूर विभाग यांनी जाधव यांच्यासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीमार्फत जाधव यांच्या कार्यकाळातील जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील झालेल्या दस्त व्यवहारांची तपासणी करण्यात आली.