Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » पोलीस अधीक्षकांच्या ऑपरेशन प्रहार, कुठे आहे अकोट विभागांत ,.? अकोट तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठरत आहेत निसक्रिय..?

पोलीस अधीक्षकांच्या ऑपरेशन प्रहार, कुठे आहे अकोट विभागांत ,.? अकोट तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट – प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठरत आहेत निसक्रिय..?  

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

ANKUSH TV18 NEWS NETWORK –  अकोट तालुका (शहर व ग्रामीण भाग)   हे सध्या विविध अवैध धंद्यांचे अड्डे बनले आहेत. मद्यविक्री, जुगार, मटका, गुटखा, तसेच इतर बेकायदेशीर व्यवसाय उघडपणे सुरू असून, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र या गोष्टींकडे डोळेझाक करत असल्याचे आरोप, शुन्य नागरिकांतून होत आहेत. ?

विशेष म्हणजे, हे अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी संबंधित राजकीय पक्षांचे आश्रय लाभल्याचे बोलले जात आहे. यामध्ये स्थानिक स्तरावर प्रभावशाली राजकीय कार्यकर्ते आणि काही भ्रष्ट अधिकारीही सहभाग घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चर्चा गावांमध्ये सुरू आहे..कारवाई टाळण्यासाठी संबंधित पोलिस व महसूल अधिकाऱ्यांवर मोबाईलद्वारे दबाव टाकला जातो, अशी चर्चा जनसामन नागरिकांन मध्ये सुरू आहे…

एसपी साहेबांची ‘प्रहार मोहीम’ यांच्यापर्यंत पोहोचत नाही..?

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरू करण्यात आलेली ‘प्रहार मोहीम’ ग्रामीण व शहरातील गुन्हेगारीवर नकेल घालण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र अकोट तालुक्यात ही मोहीम पोहोचतच नाही, की मुद्दाम अडवली जाते, असा प्रश्न शून्य नागरिकांकडून. उपस्थित होत आहे…

शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ नागरिकांच्या हालचाली टिपतात, की अवैध धंदे करणाऱ्यांचीही रेकॉर्डिंग होते – याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा स्तरीय वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याची सखोल चौकशी करून सत्य समोर आणणे गरजेचे झाले आहे.. असेही नागरिकांचे म्हणणे आहे..

पूर्वीही झालेली आहे वसुलीविरोधात कारवाई

काही वर्षांपूर्वी अकोट उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायांवर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर अवैध वसुलीचे आरोप झाले होते. त्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून काहींची चौकशी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा तशाच स्वरूपाची प्रकरणे समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे…

नागरिकांची मागणी: पारदर्शक चौकशी आणि तातडीने कारवाई

अकोट तालुक्यातील सजग नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी आहे की, या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असून, यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भय आणि असहायता वाढत आहे….

चोहोट्टा बाजार, दहिहंडा , अकोट बनले गुटखा माफी यांचे केंद्र….

राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा जिल्ह्यात गुटखा उघडली अवैध सुरू आहे… या गुरखा विक्रीचे केंद्र.चोहोट्टा बाजार, दहिहंडा , अकोट, असून सरसपणे गुटखा विक्री सुरू आहे, खुल्लम पणे.सुरू आहे आमचं कोणी वाकड करू शकत नाही. असे गुटखा माफी म्हणतात…. तसेच
गुटखा माफी यांचे. अकोला एलसीबी. चे काही अधिकारी, प्रतीक्षात गुडखा माफिया यांच्या ठिकाणी येऊन, आपला हप्ता घेऊन जातात, आणखी अवैध धंद्यांचा सुद्धा हप्ता घेऊन जातात. संबंधित पण पोलिसांना जातोय हप्ता.. त्यामुळे या याच्यावर कारवाई होत नाही..

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा