Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » पुणे महापालिकेतील कायमस्वरूपी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी युनियनची स्थापना व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न

पुणे महापालिकेतील कायमस्वरूपी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी युनियनची स्थापना व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न

ankush tv18 news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

पुणे महापालिकेतील कायमस्वरूपी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांची युनियनची स्थापना करण्यात व युनियनचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना नियुक्त करून त्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. पुणे महापालिकेतील कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विकास करणे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना पुणे मनपा मध्ये पदोन्नती, बढती न देता पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांचा विचार व पदोन्नती साठी व्हावा यासाठी कार्य करणे, स्वतःच्या मालकीचे घर नसलेल्या कर्मचाऱ्यांना पुणे महापालिकेच्या जागेवर कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देणे तसेच पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यावर त्वरित दुसऱ्या महिन्यात सर्व रकमा देऊन पेन्शन सुरू करण्यासाठी कार्य करणे. तसेच पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना सर्व सुख सुविधा, अधिकार प्राप्त होण्यासाठी कार्य करणे इत्यादी कार्य युनियनच्या वतीने करणार असल्याचे माहिती युनियनचे अध्यक्ष नितीन मोहिते यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
यावेळी युनियन मध्ये विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष राकेश कुलकर्णी, विशाल घवाळे, संघटक प्रमुख नितीन बालकी, कार्याध्यक्ष अनिल बागाव, जनरल सेक्रेटरी सचिन मोहिते, सेक्रेटरी निलेश आदमाने, सचिव अनिल गायकवाड, खजिनदार नासिर पठाण, महिला संघटक प्रमुख वंदनाताई खंडागळे, संघटक पुष्पाताई सातपुते, अर्चनाताई त्रिकोणे, कमलताई सोनवणे, संघटक प्रकाश वैराट, रोहित परमार, सुहास आल्हाट, बाळासाहेब आदमाने, प्रवीण कांबळे, यांना युनियनच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा