Ankush tv18 news network
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये दि. 17 सप्टेंबर रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. या सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या समितीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला आ. सुरेश भोळे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी तसेच सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे व उदयजी भालेराव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन जयेश भावसार यांनी केले. याप्रसंगी विशेष सत्कार म्हणून भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांची शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आ. राजूमामा आणि जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. बैठकीला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी ,नितीन इंगळे, जयेश भावसार ,भारतीताई सोनवणे ,प्रदेश सदस्य संतोष इंगळे, तसेच सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते
सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची समिती पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.
सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर – 2025
जिल्हा संयोजक :- श्री.विजय वानखेडे –
जिल्हा सह- संयोजक :- सौ. ज्योतीताई निंभोरे
जिल्हा सह- संयोजक :- श्री.सागर पाटील
जिल्हा सोशल मीडिया:- श्री.अक्षय चौधरी
सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर – 2025 अंतर्गत कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे संयोजक खालीलप्रमाणे :-
1) स्वच्छता अभियान :- संयोजक :- श्री.राजेंद्र मराठे
2) ‘एक पेड माँ के नाम’ (वृक्षारोपण कार्यक्रम करावा):- संयोजक:- सौ.भारतीताई सोनवणे
3) रक्तदान शिबीर :- संयोजक:- श्री.महेश पाटील
4) आरोग्य शिबीर :- संयोजक:- डॉ.मनोज टोके
5) पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित जीवनपट फिल्म प्रकाशित :- संयोजक:- श्री.पवन खंबायत
6) प्रबुध्द नागरिक संवाद :- संयोजक:- श्री.भूषण लाडवंजारी – सह संयोजक:- श्री.सुनील वाणी
7) दिव्यांग व अन्य प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान :- संयोजक:- डॉ.चंद्रशेखर पाटील
8) वोकल फॉर लोकलचा प्रसार :- संयोजक:- श्री.संतोष इंगळे
9) पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकांचे वाटप: – संयोजक:- श्री.राजेंद्र घुगे पाटील
10) खासदार क्रिडा चषक स्पर्धा: – संयोजक: – श्री. अरुण श्रीखंडे सह संयोजक:- श्री. निलेश बाविस्कर 11) विकसित भारत चित्रकला स्पर्धा :- संयोजक:- श्री.शिरीष तायडे
12) मोदी विकास मॅरेथॉन :- संयोजक:- श्री.महेश पाटील (युवा मोर्चा)
13) पंतप्रधान मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शिनी :- संयोजक:- श्री.प्रकाश बालाणी
14) पंडित दीनदयाळ जयंती 25 सप्टेंबर :- संयोजक:- ॲड.शुचिता हाडा
15) गांधी जयंती – 2 ऑक्टोबर :- संयोजक:- श्री. प्रदिप रोटे