Ankush tv18 news network
यावल तालुका प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बामणोद–हंबर्डी या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले. भारताचे यशस्वी व कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच “सेवा पंधरवडा” च्या पहिल्या दिवशी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्णत्वास गेली.
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांनी भरलेल्या मार्गामुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतमाल वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. या विकासकामामुळे परिसरातील जनजीवन सुलभ होणार असून हा रस्ता जीवनवाहिनी ठरणार आहे.