Ankush tv18 news network
Jalgaon
प्रखर राष्ट्रवादी, अंत्योदयाचे प्रणेता स्व. पंडित दीनदयालजी उपाध्यय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यर्पण आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व डॉ. राजेंद्र फडके यांच्या हस्ते महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच स्व.पंडितजी यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. राजेंद्र फडके यांनी ‘ पंडित दीनदयाल उपाध्याय जीवन दर्शनी ‘ या विषयावरील व्याख्यानाच्या माध्यमातून आजच्या भारतीय जनता पक्षा मार्फत – मोदी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनधन ते आयुष्यमान या सगळ्याच योजना हे कसे पंडितजींच्या अंत्योदयाचे विचारधारेवर आधारित आहे हे उलगडून सांगितले.पंडित जिमचे एकात्म मानव दर्शन, संघटना बांधणी- शिस्त, परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सनातन संस्कृती ,आयुर्वेद या सगळ्या चा आधार पंडितजीची विचारधारा कशी आहे ते विषद केले.
याप्रसंगी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, उदय जी भालेराव, सेवा पंधरवाडा अभियान संयोजक विजय वानखेडे, स्व. पंडित दीनदयाल जी उपाध्याय जयंती संयोजक ॲड. शुचिता अतुलसिंह हाडा यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.