Ankush tv18 news network
देवळी शहरात अनेक दिवसापासून सामाजिक क्षेत्रात तत्पर नेतृत्व करत आहेत. म्हणून समाजसेवक नारायण सुरकार यांची वर्धा जिल्हा समीक्षक म्हणून निवड झाली. श्री संताजी अखिल तेली समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रदेश अध्यक्ष अनिल बेनजोई , उपाध्यक्ष प्रीती चौधरी , चेतन वरटकर , गजू देशमुख , अविनाश डाफे यांच्याकडून देवळीचे समाजसेवक नारायण सूरकार यांची जिल्हा समीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली समस्त समाज बांधवांनी हार्दिक अभिनंदन केले. या अगोदर
दूध 100 लिटर कोजागिरी पौर्णिमेच्या अनुषंगाने साजरी केली व सामान्य गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके , उज्ज्वला गॅस दरवर्षी गरीब महिला लाभ मिळवून दिला त्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात , गोंडस बाळाचे पालन पोषण करण्यासाठी धडपड करतात , समाजात दरवर्षी शालेय विद्यार्थी , पत्रकार , कष्टकरी , उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्यात येतात , दरवर्षी डोळाचे शिबीर व चष्मे वाटप करण्यात आले. तसेच
गावातील सार्वजनिक चौकातील लाईट लावणे
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून वॉर्ड 10 वी 12 वी विद्यार्थी पास झालेल्याचा सत्कार करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे श्री संताजी अखिल तेली समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी कामगिरी पाहता आता जिल्ह्याची जबाबदारी पूर्णपणे सोपविण्यात आली व संघटन वाढण्यासाठी प्रयत्न करणार अशी अपेक्षा , आशा व्यक्त केली. त्याचप्रमाणे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व नारायण सुरकार यांची वर्धा जिल्हा समीक्षकपदी नियुक्ती बद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव दिसत आहेत.