Ankush tv18 news network
यावल दि.१४ ( सुरेश पाटील )
जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथे रविवार दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्व विभागातील पदाधिकारी व सव॔ जामनेर तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली त्यात प्रहार संघटनेत जामनेर तालुक्यातील २०० ते २५० दिव्यांग बंधू-भगिनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
प्रहार दिव्यांग क्रांति संघटना संस्थापक अध्यक्ष मा.बच्चूभाऊ कडू मा.राज्य मंत्री,धरमेन्द्र सातव साहेब प्रदेश अध्यक्ष,शिवाजीराव गाढे प्रदेश उप अध्यक्ष,सुरेश मोकल साहेब प्रदेश सचिव चंन्द्रभानजी गांगुरडे,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख,शरददादा बारजिभे जेष्ठ नेते जिल्हा सल्लागार वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर जोगलखेडा येथे प्रहार दिव्यांग क्रांति संघटनेचे पुव॔ विभागातील सव॔ पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष,उपअध्यक्ष महिला आघाडी तालुका अध्यक्ष उपअध्यक्ष व शहर अध्यक्ष,उपअध्यक्ष महिला आघाडी शहर अध्यक्ष,उपअध्यक्ष उपस्थित होते तिथे त्याचा सत्कार करण्यात आला.प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष श्रीहरीभाऊ विजय पाटील यांनी दिव्यांग बांधव यांच्या समस्या जाणून त्या निवारण साठी मार्गदर्शन केले व सवा॔ना आपले संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा दौरा रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगांव येथे आहे जामनेर तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे इत्यादी सूचना देण्यात आल्या व भुसावळ तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे,यावल महिला आघाडी शहर अध्यक्ष मिना जनार्दन देशमुख,उप अध्यक्ष रेखा रविन्द्र चौधरी,बोदवड महिला आघाडी तालुका उपसचिव मायाताई गवळी तसेच प्रहार दिव्यांग क्रांति संघटना बोदवड तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार यांनी त्यांच्या लेटर पॅडवर जामनेर तालुका अध्यक्ष चंपालाल कुमावत यांची निवड व जामनेर तालुका महिला आघाडी तालुका संघटक पदी सुरेखा दादाराव चौव्हाण यांची नियुक्ति करण्यात केली. व प्रहार दिव्यांग क्रांति संघटना महिला आघाडी तालुका अध्यक्ष सकूबाई लक्ष्मण पवार यांनी जामनेर तालुक्यातील २०० ते २५० कार्यकर्त बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेत जोडले त्यांचे कोतुक केले. मिटिंग आयोजक प्रहार दिव्यांग क्रांति संघटना महिला आघाडी जामनेर तालुका अध्यक्ष सौ.सकूबाई लक्ष्मण पवार यांनी सर्वांना नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केली व शेवटी आभार व्यक्त केले.