ANKUSH TV18 NEWS NETWORK
जळगाव राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने टॅंगो देशी दारूचा कारखाना सुरू! जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बना व दारू तयार करणाऱ्या कारखाना उद्ध्वस्तपोलीस निरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पारोळा पोलीस स्टेशन हददीत एक बनावट देशी दारु टैंगो पंच कंपनीचा देशी दारुचा कारखाना आहे. सदरची मिळालेली माहितीवरुन मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांना माहिती अवगत करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव श्रीमती कविता नेरकर पवार यांच्या सुचने प्रमाणे पारोळा पोलीस स्टेशन हददीतील बहादरपुर गावाच्या शिवारात असलेली बोरी नदीच्या किनारावर एक लोखंडी पत्राच्या शेड मध्ये बनावट अवैद्य देशी टॅगो पंच नावाचा कारखाना असल्याची खात्री झाल्यावरुन दोन शासकीय पंच यांना सोबत घेवून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक बाजीराव कोते, पोलीस निरीक्षक सचिन सिताराम सानप, पोउपनि अमोल कचरु दुकळे, पोलीस हवालदार सुनिल कौतिक हटकर, महेश रामराव पाटील, डॉ. शरद तुकाराम पाटील, प्रविण शालीग्राम पाटील, पोलीस अंमलदार अनिल तुळशीदास राठोड, अजय महारु बाविस्कर, आकाश काडू माळी, विजय अशोक पाटील, शेखर देविदास साळुंखे, चालक पोह संजय लोटू पाटील, चालक पोह वेलचंद बाबुराव पवार अशांनी सदर बनावट देशी दारु असलेल्या ठिकाणी शितापीने कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या ठिकाणी खालील प्रमाणे मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ९० एम.एल. मापाच्या टँगो पंच तयार सीलबंद विक्रीसाठी तयार ३१ खोके असून एका खोक्यात १०० नग एकूण ३१०० नग असलेले एक खोक ४००० रुपये किंमतीचा असे एकूण १ लाख २४ हजार रुपये किंमतीचा
२) ९० एम.एल. मापाच्या टैंगो पंच तयार माल परंतू सीलबंद व लेबलींग करणे बाकी असलेला विक्रीसाठी तयार करण्यासाठी असलेल्या ७०० बाटल्या एक बॉटल छापील किंमत ४० रुपये असे एकूण ७०० बॉटल एकूण २८ हजार रुपये अंदाजे किंमतीची
३) स्पिरीट ४ बॅरल २०० लीटर प्रमाणे एकूण ८०० लीटरा कच्चामाल ३ लाख ५५ हजार रुपये अंदाजे किंमतीची
४) ७५० लीटर च्या २ टाक्यात ज्यात तयार दारु मशिन मधून बॉटल मध्ये पॅकींगसाठी तयार १५०० लीटर एकूण ३ लाख रुपये अंदाजे किंमतीची
५) दारु साठी लागणारे आर.ओ. मशिन सेटअप ऑटोमॅटीक मशीन ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची
६) CNC मशिन कॉम्प्युटर न्युमिरीकल कंट्रोल मशीन बॉटल सिलींग व पॅकींग कामी असलेली मशिन ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची
७) पाणी लिप्टींग करण्यासाठी मशिन ५ हजार रुपये अंदाजे किंमतीची
८) किंग इंडीया कंपनीचे विद्युत स्टॅपीलायझर मशिन ५ हजार रुपये अंदाजे किंमतीची
९) ३ बॉक्स टँगो पंच बुच ३० हजार नग ७५ हजार रुपये अंदाजे किंमतीची
१०) टैंगो पंच पॅकींग करण्यासाठी खाली बॉटल ९० एम.एल. मापाची १ बॉक्स मध्ये १२०० नग असलेली एकूण ५१ बॉक्स त्यात ६१,२०० नग असलेला खालील बॉटल ६ लाख १२ हजार रुपये अंदाजे किंमतीची
११) १००० लीटर पाणीच्या टाक्या २ नग ६००० प्रति नग एकूण १२ हजार रुपये अंदाजे किंमतीची
१२) ७५० लीटर पाणीच्या टाक्या २ नगर ४५०० प्रति नगर एकूण ९००० हजार रुपये अंदाजे किंमतीची
१३) ईलेक्ट्रीक स्टाटर व इलेक्ट्रीक पयुज असलेली पेटी ३००० हजार रुपये अंदाजे किंमतीची
१४) मिक्सर मशिन एक नग ५००० हजार रुपये अंदाजे किंमतीची
१५) १ बोलेरो महिंद्रा कंपनीची मालवाहु गाडी, अंदाजे किंमत ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची
१६) १ स्वीष्ट डीझायर मारोती सुजूकी कंपनीची कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये अंदाजे किंमतीची
१७) ४० बाय ४० लोखंडी पत्राचे शेड अंदाजे किंमत ५ लाख रुपये किंमतीचे
येणे प्रमाणे ४० लाख ३३ हजार रुपये किंमतीची कारवाई करण्यात आलेली आहे.