Ankush tv8 news network
अकोट प्रतिनिधी
तालुक्यातील चोहाट्टा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, तालुका अध्यक्ष चरण इंगळे, तालुका संघटक सुरेंद्र ओईबे, मनोहर भाऊ शेळके, आम्रपाली ताई खंडारे, प. स. सदस्या सपना झ्यास्कर, शोभा ताई शेळके, पत्रकार प्रभाकर बोरकर, निखिल भाऊ गावंडे (महाराष्ट्र ग्रामीण न्यूज), निळकंठ वसू पाटील तसेच माजी आमदार खतीब साहेब व इतर आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मान्यवरांनी आगामी निवडणुकीसंदर्भात पक्ष संघटन, रणनीती आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. चहा-फराळासह खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक यशस्वीरीत्या पार पडली.