ANKUSH TV18 NEWS NETWORK
JALGAON
सदर गुन्हयातील आरोपी नामे १) गणेश वासुदेव जाधव वय २० वर्ष २) गणेश अशोक पाटोल वय २१ वर्ष ३) अक्षय विजय वंजारो वय २३ वर्ष सर्व रा. चिंचोली ता.जि. जळगांव यांना निष्पन्न करण्यात आले असुन त्यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील बकरी व बोकड चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांनी एमआयडीसी पो.स्टे. हद्दीतून सुध्दा ०३ बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयात चोरलेला बोकड व बकरी खाटीक राहुल रतन राऊळकर यांना विक्री केल्याबाबत सांगितल्याने गुन्हयात चोरीस गेलेली बकरी खाटीक याचेजवळुन जप्त करण्यात आली असुन बोकडाची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या ०२ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून असुन नमुद आरोपी यांना पुढील तपासकामी शनिपेठ पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शनिपेठ पो.स्टे. करीत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सो., जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि, शरद बागल, सफी/अतुल वंजारी, पोहेको प्रविण भालेराव, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकों/विजय पाटील, पोहेको अक्रम शेख, पोहेको नितीन बाविस्कर, पोना/किशोर पाटील, पोकों/रतनहरी गिते, पोकों/सिध्देश्वर डापकर, पोकों/प्रदीप चवरे, पोकों/रविंद्र कापडणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी केली आहे.