Ankush tv18 news network
रावेर: Jalgaon
(जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी)
रावेर: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पदवी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत (Merit List) रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर येथील इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांनी कु तेजल बाळू महाजन , कु वैष्णवी मनोज सोनार यांनी 2024 बी. ए इंग्रजी विषयात उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात शिक्षण घेतलेल्या कुमारी तेजल बाळू महाजन हिने संपूर्ण विद्यापीठातून इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तर, याच विभागातील कुमारी वैष्णवी मनोज सोनार हिने विद्यापीठातून द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाची मान उंचावली आहे.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दोन क्रमांकावर रावेर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नाव झळकल्याने त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा हेमंतभाऊ देविदास नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, उपप्राचार्य, डॉ. संदीप धापसे, इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख, डाँ निता जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ जी आर ढेबरे, प्रा सत्यशिल धनले, क्रिडा शिक्षक उमेश पाटील आणि सर्व प्राध्यापक वर्गाने त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे





