ANKUSH TV18 NEWS NETWORK मानवत / वार्ताहर -दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी हिंदी या विषयावर आधारित भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तर या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ. शारदा राऊत मॅडम, प्रा. सूर्यवंशी सर तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. जाधव सर उपस्थित होते. तर या प्रसंगी विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.
प्रदर्शनाच्या वेळी ग्रंथपाल डॉ. सचिन चोबे यांनी सूत्रसंचालन केले.
तसेच ग्रंथ प्रदर्शनामागील उद्दिष्ट व भूमिका त्यांनी सविस्तरपणे मांडली. उद्घाटनानंतर प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना सविस्तर असे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांना ज्ञानसंपादनासाठी ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. सूर्यवंशी यांनी हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेचे शैक्षणिक , सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास करावा असे सांगितले.
या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय कर्मचारी श्री. बोचरे, श्री. गुंडाळे, श्री. मिटकरी व श्री. शिंदे यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात वाचन व अभ्यास या विषयी नवचैतन्य निर्माण झाले.
