Jalgaon -Ankush Tv18 News network कॅफे कॉलेज कट्टा येथे 7 जोडपे (मुले व मुली)अश्लिल चाळे रंगेहात सापडले ! पोलीसांनी केला पर्दाफाश, कॅफे चालकावर कारवाई…. ?
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी जामनेर येथील नुकत्याच झालेल्या कॅफे मधील घटनेचे पार्श्वभुमी वरुन रामानंद नगर पोस्टे हददीतील कॅफे पडताळणीकामी गुन्हे शोध पथकास आदेशीत केले असता, पोलीस पथकास रामानंद नगर पोस्टे हददीतील गोल्ड जिमचे पुढे थोड्या अंतरावर कॅफे कॉलेज कट्टा नावाखाली गाळयामध्ये प्लायवुडचे कंपार्टमेंट करुन, पडदे लावुन अंधार करुन शाळा कॉलेज मधील मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असतात अशी माहीती मिळाली सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे तात्काळ कॅफे कॉलेज कट्टा येथे अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान सदर कॅफेमध्ये ३ X ३ लांबी रुंदीचे प्लाऊडचे व सुमारे ५ फुट उंचीचे विवीध कप्पे व त्यास बाहेरच्या बाजुने पडदे बसविलेले आढळुन आले. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोपे ठेवलेले दिसुन आले. छाप्या दरम्यान नमुद कॅफे मध्ये एकुण 07 जोडपे (मुले व मुली) तेथे अश्लिल चाळे करताना मिळुन आले. त्यांना बाहेर बोलावुन त्यांचेकडुन माहीती घेतली व सदर मुलामुलींचे पालकांना समज देण्यात आली
आम्ही सदर कॅफेची पाहणी केली असता कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफी शॉपचा परवाना नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साधने दिसुन आले नाही. यावरुन सदर अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली करीता सदर कॅफे चालक नामे मुकेश वसंत चव्हाण वय ३० वर्ष, रा, रोटवद ता जामनेर जि जळगांव ह/मु लाडवंजारी मंगलकार्यालय, जळगांव याचे विरुद्ध रामानंद नगर पोस्टे CCTNS गुरनं 287/2025 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (अ) (क) अन्वये सरकारतर्फे गुन्हा नोंदविण्यात आला
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेडडी, सो मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, सो मा.SDPO जळगाव भाग जळगाव श्री संदीप गावीत सो यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे नेतृत्वात PSI/ सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार / सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक / योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, मपोशि/स्वाती पाटील, आदींनी सहभाग घेतला असुन, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे आदेशान्वये गुन्हयाचा पुढील तपास पोह/जितेंद्र राठोड हे करीत आहेत.