Home » महाराष्ट्र » कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे राजेंद्र डोंगे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे नेतृत्व

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे राजेंद्र डोंगे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे नेतृत्व

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush tv18 news network  महेश निमसटकर   तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती दि.3:-मागील काही महिन्यांपासून उलथापालथ सुरु असलेल्या भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटी आज (दि.३) ला घडी बसली. बाजार समितीच्या शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पक्षाच्या संचालकांनी काल (दि.२) ला भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. व भारतीय जनता पक्षाचा झेंडा बाजार समितीवर रोवला. आज (दि.३) ला बाजार समितीच्या सभापतींची निवड पार पडली, यात १३ मतांनी बाजार समितीचे बांधकाम सभापती राजेंद्र डोंगे यांची बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाली. राजेंद्र डोंगे हे आधी काँग्रेस पक्षात होते. चेकबरांज मानोरा ग्रामपंचायतचे ते उपसरपंच आहेत. कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत ते कामगार नेते म्हणूनही ओळखल्या जातात. या निवडीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आज (दि.३) ला पार पडलेल्या सभापती निवडणुकीकरिता बांधकाम सभापती राजेंद्र डोंगे व संचालक ज्ञानेश्वर डुकरे यांनी अर्ज दाखल केला. गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे राजेंद्र डोंगे यांना १३ तर ज्ञानेश्वर डुकरे यांना ५ मते पडली.

या घडामोडीत भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, तालुका अध्यक्ष शामसुंदर उरकुडे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, विनोद पांढरे, रमेश राजूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे आदींचा सहभाग होता.

यावेळी भाजपवासी झालेले कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उपसभापती अश्लेषाताई मंगेश भोयर, संचालक गजानन उताणे, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर आगलावे, शामदेव कापटे, परमेश्वर ताजणे, शांताताई रासेकर, शरद जांभुळकर, कान्होबा तिखट, मोहन भुक्या, अनिल चौधरी, राजु आसुटकर, विविध कार्यकारी सहकारी संस्था भद्रावती अध्यक्ष रोहण कुटेमाटे, उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, अरुण घुगुल, सतिश वरखडे, पवन नगराळे, आनंद तागडे, हरी रोडे, संतोष माडेकर, मारोती नागपूरे, आशा ताजणे, शिला आगलावे, वर्षा आत्राम आदी उपस्थित होते.

रविंद्र शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश सत्र सुरु केले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व घडामोडी पार पडल्या. शिवसेना (उबाठा) गटाचे सर्व संचालक भाजपात आले तर बाजार समितीतील काँग्रेसचे राजेंद्र डोंगे, अनिल चौधरी व राजु आसुटकर या तीन संचालकांना भाजपात आणुन त्यांच्यापैकी राजेंद्र डोंगे यांना बाजार समितीचे सभापती पद देऊन शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक दिला.

काही महिन्याअगोदर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. आणि अल्पावधीतच त्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना भाजपात आणण्याची खेळी केली.

निवडून आल्यानंतर पदाधिकारी हा पक्षाचा राहत नसुन जनतेचा होतो, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जनतेची कामे केली पाहिजे, या मताचे रवींद्र शिंदे आहेत. सभापती पदा निवड झालेले राजेंद्र डोंगे हे काँग्रेस मधे असताना शिंदे यांनी त्यांना बांधकाम सभापती पद दिले होते. यावरुन विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची सचोटी दिसून येते.

भाजपात होणार भव्य प्रवेश
यानंतर येत्या काळात रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांच्या सोबत काम करीत असणारे इतर राजकीय, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश भारतीय जनता पक्षात होणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा