Ankush tv18 news network
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चुरस वाढण्याची शक्यता
अकोट (प्रतिनिधी) – अकोट तालुक्यातील माजी जि प सदस्य जिल्ह्यातील धनगर समाजाचे प्रखर नेते आणि सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. त्यांच्या या घरवापसीमुळे धनगर समाजात आनंदायी वातावरण तयार झाले. अकोला जिल्हा व तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
स्वगृही वंचित बहुजन आघाडीत काशीरामजी साबळे यांनी पुन्हा प्रवेश करताना पक्षाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर,यांच्या उपस्थिती मद्ये माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ भारिप आणि विनोद नांदुरकर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात विविध कार्यकर्त्यांनी देखील सहभाग नोंदवला.काशीराम भाऊ सोबत सौ लीलाबाई देविदास गावंडे माजी प. समिती तेल्हारा सभापती यांनी पण पुणे येथे पक्ष प्रवेश केला आहे. काही दिवसा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अ. गट यांनी काशीराम भाऊ यांना राज्यस्तरीय सचिव पद दिले होते पण श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमा पोटी पुन्हा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे
या घडामोडींमुळे अकोट तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.