Ankush tv18 news network
जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी
फैजपूर : फैजपूर पोलीस ठाण्यात आगामी दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर अध्यक्षस्थानी होते. तर पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे (पो. स्टे. फैजपूर) व पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे (पो. स्टे. निंभोरा) हे मान्यवर म्हणून विशेष उपस्थित होते.बैठकीत शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, विविध दुर्गा देवी मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच फैजपूर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
यावेळी अधिकारी व पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळ शांततेत, नियमांचे पालन करून पार पाडावा यासाठी सविस्तर सूचना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण न करणे, रस्ते मोकळे ठेवणे, प्रतिष्ठापना व विसर्जन ठरलेल्या वेळेत पार पाडणे, गुलालाचा वापर टाळणे, डीजेचा वापर न करणे यावर भर देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांनी रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेसाठी सदस्य नेमणे, देवी मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घेणे, तसेच आक्षेपार्ह गाणी, पोस्टर, बॅनर्स यावर बंदी पाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.बैठकीदरम्यान सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या अडचणी व मागण्या प्रशासनाने ऐकून घेतल्या. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात कायद्याचे पूर्ण पालन होईल तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.शेवटी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, “गणेशोत्सव व दुर्गोत्सव हा धार्मिक श्रद्धेशी निगडीत असून तो शांततेत, सुरक्षिततेत व सामाजिक ऐक्याने साजरा करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आदर्शवत पद्धतीने उत्सव साजरा करावा,” असे आवाहन त्यांनी केले.