Ankush tv18 news network
यावल दि.२० ( सुरेश पाटील )
कोणत्याही जाती धर्मातील तरुणांनी आपले धार्मिक सण, उत्सव साजरे करताना मूर्तीच्या उंचीला तसेच आधुनिक नाच गाण्यांना फारसे महत्व न देता ते उत्सव आपल्या जुन्या परंपरेनुसार, शास्त्रानुसार शुद्ध,पवित्र मनापासून, हृदयापासून साजरे केल्यास, कोणाच्याही धार्मिक,अध्यात्मिक भावना दुखावणार नाही हे धार्मिक अध्यात्मिक आणि जातीय सलोख्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान शेठ यांनी उपस्थितांना केले.
धार्मिक स्थळाजवळ स्पीकरचा आवाज कमी पाहिजे असा मुद्दा उपस्थित करून डीजे चालक वाजवी पेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवीत असल्याने त्याचा त्रास ज्येष्ठ स्त्री-पुरुष नागरिकांना होत असून कर्कश आवाजाने व्हायब्रेशन ने घरातील भांडे सुद्धा खाली पडतात त्यामुळे डीजे चालकांवर आतापर्यंत यावल पोलिसांनी गुन्हे दाखल केले का..? असा प्रश्न श्रद्धा शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.