आरोपी नामे 1) शंकर उषन्ना पालथ, वय 50 वर्ष, रा. गुडा, ता. जैनात, जिल्हा अदिलाबाद (तेलंगणा)
2) गिरीष लक्ष्मारेड्डी येल्टीवार, वय 46 वर्ष, रा. वार्ड 36 शांतीनगर आदिलाबाद, ता. जिल्हा अदिलाबाद (तेलंगणा) हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातिल खेडे गावात जैव संप्रेरक(BIO Stimulant) ची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती आधारे शिवा जाधव कृषी विकास अधिकारी जी. प. वर्धाप्र मोद पेटकर जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, वर्धा शु,भ्रकांत भगत, तालुका गुण नियंत्रण निरीक्षक, हिंगणघाटधाड टाकली असता त्यांचे कडून विविध प्रकारचे जैव संप्रेरक ज्याची अंदाजित किंमत ही 245603 एवढी होती व विक्री करिता वापरात असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार असे मिळून अंदाजे रक्कम रु. 1195603 चा मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या ताब्यात
देण्यात आले.आरोपींचे विरुद्ध भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 318 (4), 3 (5), सहकलम रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 चे कलम 2. कलम 5, 7, 8, 11, 20 (ब) सहकलम 3, 7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अन्वये श्री शुभ्रकांत भगत तालुका गुण नियंत्रण निरीक्षक हिंगणघाट यांचे फिर्यादीवर गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलिस निरीक्षक हिंगणघाट यांचे कडे देण्यात आले.