Ankush tv18 News
अकोट तालुका प्रतिनिधी निळकंठ वसू… अकोला जिल्ह्यात सध्या अनेक मराठी उद्योजक व व्यापारी नव्या जोमाने पुढे येत आहेत. त्याच पंक्तीत ग्रामीण भागातील एक नाव झपाट्याने प्रसिद्ध होत आहे — श्री. अंकुर धनराज गावंडे, मरोडा (ता. अकोट, जि. अकोला)
श्री. गावंडे हे शेतकरी कुटुंबातील पुत्र असून त्यांनी सरकारी नोकरीचा माग सोडून स्वतःच्या मेहनतीवर आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावर देवरी फाटा (ता. अकोट) येथे १ वर्षांपूर्वी “गुरु माऊली कृषी सेवा केंद्र” सुरू केले.
फक्त व्यापार न करता, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, कृषी सल्ला आणि कमी नफ्यात उत्तम दर्जाचे शेतीसंबंधित बी बियाणे खते आणि इतर साहित्य पुरविणे हे त्यांचे ध्येय आहे.
अत्यल्प कालावधीतच त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून त्यांच्या सेवेमुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यास मदत झाली आहे.
अंकुर गावंडे यांची ही यशोगाथा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी दाखवून दिलं की
“नोकरीपेक्षा व्यवसाय आणि समाजसेवा यांचा संगम केल्यासच खरे यश मिळते.”