Ankush tv18 news network
अकोट
अकोट तालुक्यातील चौहट्टा बाजार परिसरातून सोलापूर जिल्ह्यातील शिगोली गावातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. चौहट्टा बाजारातील कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि शेतमजूर यांनी सढळ हाताने जीवनावश्यक वस्तू एकत्रित करून पूरग्रस्तांना दिल्या.
या मदत वाटपावेळी चौहट्टा बाजार येथील विविध सामाजिक संघटना व पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. धाडस सामाजिक संघटनाचे प्रमुख शरद दादा कोळी यांनी विशेष उपस्थिती लावून चौहट्टा बाजार आणि परिसरातील जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या चौहट्टा बाजार परिसरातील जनतेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.