Ankush tv18 News network
Jalgaon
अवैध गुटखा वाहतुक करणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद………
मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, जळगांव यांनी स्थानिक गन्हे शाखा, जळगावं येथील पथकास जळगांव जिल्हात अवैध गुटखा वाहतुक व विक्री करण्याकरीता प्रमाण वाढले असुन गोपणीय माहीती काढुन अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेशोत दिले होते.
MH-४६८१०६५ या वाहनात अवैध गुटख्याची वाहतुक असल्याने वाहनातील चालक यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव अरबाज नौशाद बेग वय-३० वर्षे रा-काझी, हाऊस, खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१०,१९,०२०/- (दहा लाख एकोनविस हजार विस रुपये) किंमतीचा रजनीगंधा सुंगधीत पानमसाला व करमचंद प्रिमियन पान मसाला, मिराज तंबाखु, विमल पान मसालास, पानपराग पान मसाला, जाफराणी जार्दा व ताब्यातील वाहन तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल ताब्यात मिळुन आला.
सदरची कारवाई ही.मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, जळगांव तसेच मा.सुभाष ढवळे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग, मुक्ताईनगर मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा जळगांव व आशिष आडसुळ पो.नि. मुक्ताईनगर पो.स्टे याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सदरची कारवाई स, पो.नि जयेश पाटील, पोउनि. निलेश गोसावी, दोन्ही नेम मुक्ताईनगर पो.स्टे, पोह. विजय पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र चौधरी, सलिम तडवी, छगन तायडे, रतनहरी गिते, हेंमत पाटील, सर्व नेमणुक-स्थानिक गुन्हे शाखा, जळागंव व पो.अं. गोविंद सुरवाडे, गोविंद पवार नेमणुक- मुक्ताईनगर पोलीस स्टेसन अशांनी केली आहे





