Ankush tv`8 news network
जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी
तालुक्यात मोसंबी बागायतदारांची फळगड प्रचंड प्रमाणात झाल्याने संकटात आले असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
तालुक्यातील सारोळा बुद्रुक शिवारात सचिन सोमवंशी यांची स्वतः ची मोसंबी बाग आहे. या बागेतील अचानक वातावरण बदलाचा फटका बसुन शेतकर्यांच्या तोडांत येणार घास
खाली पडल्याचे दिसून आले आहे.
कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आपल्या मागणीत असे म्हटले आहे की, मोसंबी ला वर्षे भर लावलेला खर्च आणि उत्पन्न त्यातच पडलेला भाव यात खुप मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच मोसंबी शेतकरी संकटात सापडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तलाठी कडे आपल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अर्ज करावा अन्यथा आमच्याशी संपर्क करावा जेणेकरून महसूल विभागाला पंचनामे करण्यासाठी भाग पाडु.. मोसंबी या फळा पासुन सी व्हीटॅमीन जरी मानवाला मिळत असेल तरी जर शासनाने अर्थरुपी मदतीचे व्हीटॅमीन शेतकऱ्यांना दिले नाही तर मोसंबी बागा उपटून फेकल्या शिवाय पर्याय राहणार नाही असे श्री सोमवंशी यांनी शेवटी सांगितले.
महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अन्यथा शासनाना विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शेवटी दिला आहे.