भदावती दि.4:- वरोरा भद्रावती:-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष बकाल यांचे उपविभागीय पोलीस कार्यालय वरोरा येथे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात संतोष बकाल यांनी पत्रकारितेची समाजातील गुन्हेगारी प्रतिबंध आणि न्यायसंबंधातील महत्व सांगत पत्रकारांना सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.
संतोष बकाल यांनी त्यांच्या सामाजिक कार्यात पत्रकारितेची भूमिका फार महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी त्यांनी अडचणी कशा येतात म्हणून त्यांनी आपले मत मनमोकळे स्पष्ट करीत “पोलीस म्हणून अनेक अडचणींना सामोरे जाताना मानपान”, प्रतिष्ठा या बाबतीत त्यांना सहन करण्यासारखे अनुभव येतात” आणि “तीच परिस्थिती पत्रकारांना देखील भेडसावते,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच, जनता आणि काहीविरुद्ध शंका, आरोप येतात; पण प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ राहिल्यास मनाला समाधान मिळते, असेही त्यांनी सांगितले.
या सदिच्छा भेटीत उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष बकाल यांच्याशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबई चंद्रपूर जिल्हा शाखेचे मार्गदर्शक तथा दैनिक तरूण भारत तालुका प्रतीनीधी रूपचंद धारणे, जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक लोकशाही वृत्तपत्राचे जिल्हा प्रतीनीधी शंकर बोरघरे, तालुका अध्यक्ष शाम चटपल्लीवार, कार्याध्यक्ष पवन शिवणकर, महेश निमसटकर, निशांत देवगडे आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आणि पत्रकार संघ यांच्यात संवाद वाढवून गुन्हेगारी प्रतिबंध आणि न्याय यासाठी सहकार्य कसे फायदेशीर ठरू शकते यावर विस्तृत विचारविनिमय झाला.
संतोष बकाल यांनी पत्रकार संघासोबतच्या सहकार्यामुळे पोलीस प्रशासनाला समाजातील सुरक्षितता आणि नागरिकांना न्याय्य सेवा पुरवण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
पत्रकार आणि पोलीस यांच्यातील संवाद आणि सहकार्य वाढवून समाजातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सदिच्छा भेटीत माध्यमांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या मजबूत नात्याचा प्रत्यय देणारा ठरला असल्याचे समाधान व्यक्त होत आहेत.