ANKUSH TV18 NEWS NETWORK
WASHIM – ADV. K.R.CHAUVAN
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा तांडा येथे परिसरात संत सेवालाल महाराजांचा सप्ताह मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या दरम्यान दररोज भजन, प्रवचन व सामूहिक अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे प्रथम वर्ष असून त्याची सुरुवात विनोद राठोड यांच्या घराच्या परिसरामध्ये प्रतिमा सप्ताह स्थापन करून प्रत्येक दिवशी सेवालाल महाराज यांच्या नावाने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कासोळा तांडा व तसेच भजनकरी मंडळींनी व भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सेवालाल महाराजांच्या शिकवणींचा लाभ घेतला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करून भाविकांना प्रसाद देण्यात आले. समाजातील युवक-युवतींनी , महिला व युवक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून संतांचे विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून संतांच्या विचारांचे प्रतिपादन केले.
पालखीची सुरुवात सेवालाल महाराज मंदिर ते भवानी आई मंदिर पासून प्रस्थान करून सती आई मंदिर व तसेच तांड्या मध्ये रॅली काढून संपूर्ण परिसरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण सप्ताहात श्रद्धाळू भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. या वेळी तांड्याचे नायक कारभारी आणि संपूर्ण तांड्या तील महिला उपस्थित होत्या तथा सेवा साम्राज्य प्रतिष्ठान युवक उपस्थित होते सेवालाल महाराजांच्या जयघोषात सेवालाल महाराज मंदिर कासोळा तांडा येथे भोग लाऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली.