SPEACIAL IMPACT NEWS
शासन आणि लोकप्रतिनिधी ठरता आहे निष्क्रिय आणि हतबल..?
अवैध धंदे,चुकीचे कामे करणाऱ्यांचे कलेक्शन करणारे कलेक्टर कोण..?
ANKUSH TV18 NEWS NETWORK
CHIEF EDITOR- VIJAY B.DANEJ ,JALGAON
जळगाव जिल्ह्यात सर्वस्तरात जे अवैध धंदे सुरू आहेत,आणि समाजात,ग्रामीण भागात,शहरात जे काही चुकीची,बेकायदा कामे सुरू आहे त्यामुळे नागरिकांना व त्यांच्या आरोग्यास,दैनंदिन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असून त्यात आर्थिक लूट करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर संबंधित काही हस्तक्षेप करून आपला राजकीय,सामाजिक प्रभाव शासकीय यंत्रणेवर टाकीत असल्याने शासन आणि काही ठराविक लोकप्रतिनिधी हतबल झाले असल्याची चर्चा सर्व स्तरात आहे.
अवैध धंदे,चुकीची कामे करणाऱ्यांची यादी किंवा माहिती घेतली असता / किंवा ठिक- ठिकाणी सुरू असलेल्या चर्चा ऐकल्या असता असता अवैध धंदे, अवैध वाहतूक,चुकीच्या काम- धंद्यात,व्यवहारात जे काही व्यवसाय करणारे आहेत ते कोण आहेत.? ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का.? त्यांच्याकडे कोणत्या राजकीय पक्षातील पदाची जबाबदारी आहे का.? आणि राजकीय पक्षाची जबाबदारी दिली असली तर त्यांच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या व्यवसायाबाबत, उद्योग- धंद्यांबाबत त्याची माहिती नाही का.? आणि चुकीचे काम अवैध धंदे करताना शासकीय वर्तुळातून कारवाई होऊ नये म्हणून कोण कोणाला संबंधित आप- आपल्या भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून कारवाई व्हायला नको असा दबाव आणि प्रभाव शासकीय काम- काजात कोण कोण आणत आहे हे समाजातील सुज्ञ मतदार आणि नागरिकांना समजत नाही का.? आणि चुकीचे आणि बेकायदेशीर दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कायमस्वरूपी कारवाई का होत नाही.? याबाबत संपूर्ण भुसावल शहरासह जिल्ह्यात समाजात, सुज्ञ नागरिक व मतदारांमध्ये चर्चा आहे.
कलेक्शन करणारे कलेक्टर कोण..?
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध प्रवासी वाहतूक आणि चुकीचे कामे जे जे सुरू आहे त्यांच्याकडून कलेक्शन करणारे कोण.? कलेक्शन करणाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे..? कलेक्शन करणाऱ्यांना दुसरे कोणतेच काम मिळत नाही का.? आणि कोट्यावधी रुपयाचे कलेक्शन गोळा करून त्याची वाटप कोणा कोणाला केली जाते. त्या कलेक्शनची वाटप करताना करताना पक्षपातीपणा – भेदभाव करून आपापसात गैरसमज होत असल्याने कलेक्शन करणार कलेक्टर यांच्याबाबत मात्र हातात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत गेल्या दोन वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात कलेक्शन करणाऱ्या कलेक्टरची यादी जाहीर झाली होती त्यानुसार आता पुन्हा कलेक्शन करणाऱ्या कलेक्टरांची यादी जाहीर होणार असल्याची चर्चा आहे.
सीसीटीव्हीत नोंदी होत नाही का..? याची चौकशी आणि कारवाई कोण करणार…
जळगाव जिल्ह्यात ठीक ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असताना या सीसीटीव्ही यंत्रणेत चुकीची कामे,अवैध वाहतूक,अवैध धंदे याबाबत नोंदी होत नाहीत का..? आणि होत असतील तर कारवाई काय.,? आणि सीसीटीव्ही नोंदी होत नसतील तर सीसी टीव्ही कॅमेरे कशासाठी.? नोंदी झालेल्या असतील तर आणि त्याची दखल का घेतली जात नाही याची आपल्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित आहे.आणि कारवाई करू शकत नसले तर त्यांच्यापर्यंत सुद्धा कलेक्शन करणारा कलेक्टर पोहोचतो का.? असा प्रश्न उपस्थित केला जात जात असून याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा आहे.